Uncategorized

Solapur crime | सोलापूर हादरले! तोंडी तलाकनंतर पुन्हा एकत्र राहण्याच्या वादातून पतीने पत्नीला जिवंत जाळले

                           सोलापुरात पतीकडून पत्नीला जाळण्याचा प्रयत्न

सोलापूर -सोलापूर शहरातील लोकमान्य नगर परिसरात बुधवारी रात्री घडलेली एक थरारक घटना परिसराला हादरवून गेली. रात्री साडेनऊच्या सुमारास पतीने पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पतीसह आठजणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नर्गिस फैजान शेख (वय ३२, रा. लोकमान्य नगर जि. प. शाळेच्या जबळ, मजरेवाडी, सोलापूर) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेच्या फिर्यादीवरून तिचा पती फैजान, सासरा जावेद, सासू शमशाद, दीर फुरखान, जाऊ उमेरा, नणंद असिफा, तेहसीन, मौना (सर्व रा. मकदूम हॉलजवळ, मुलतानी बेकरी, होटगी रोड, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नर्गिस आणि फैजान यांचा विवाह ७ सप्टेंबर २०२४ रोजी झाला होता. सुरुवातीचे काही महिने त्यांचा संसार सुरळीत चालला, मात्र नंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. दोघेही काही काळापासून वेगळे राहत होते. फैजानने नर्गिसला तोंडी तलाक दिला होता, परंतु नर्गिसला पुन्हा एकत्र राहायचे होते. याच कारणावरून त्यांच्यात वारंवार बाद होत होते. बुधवारी रात्री नर्गिस ही माहेरी असताना फैजान सासरी आला.

नर्गिसची आई, बहिणीस घराबाहेर जाण्यास सांगून तो नर्गिस हिच्याशी बोलत होता. सुरुवातीला शांतपणे सुरूझालेली चर्चा काही वेळातच बादात बदलली. रागाच्या भरात फैजानने सोबत आणलेली पेट्रोलची बाटली काढली आणि नर्गिसच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले. आग लागल्यावर नर्गिस जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळाली, तर आरोपी फैजानने घटनास्थळावरून पलायन केले.

जखमी अवस्थेत नर्गिस ही घराबाहेर धावत आली, तेव्हा आजूबाजूचे नागरिक धावून आले. तत्काळ नागरिकांनी नर्गिसला शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​