Satara news | सातारा पालिकेचा आरोग्य विभाग सुस्त? कल्याणी विद्यालय परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत

साताऱ्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला
सातारा – सातारा शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली पहायला मिळत आहे. परंतु नव्याने हद्दीत समाविष्ट झालेल्या गोडोली येथील साईबाबा मंदिर ते अण्णासाहेब कल्याणी विद्यालय या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
येथील नागरिकांनी आपल्या तक्रारी पालिकेत केल्या असून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने तरुण भारत संवादकडे कैफियत मांडली आहे. तसेच उपाध्यक्ष अॅड. दत्ता बनकर आणि नगरसेवक रवी पवार यांच्याकडेही तक्रारी केल्याचे सांगितले आहे.सातारा शहरात आरोग्य विभागाच्यावतीने चांगले काम होत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मोकाट भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली पहायला मिळत आहे. विविध भागातल्या नागरिकांनीसातारा पालिकेकडे लेखी तक्रार करुन त्याबाबत विनंती केली आहे.
त्यामध्ये साईबाबा मंदिर ते अण्णासाहेब कल्याणी विद्यालय या परिसरात अनेक कॉलन्या, अपार्टमेंट हे नव्याने झालेले असून याच परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. तेथील स्थानिकांनी त्याच अनुषंगाने सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे लिखीत तक्रारी केल्या आहेत. परंतु कार्यवाही होत नसल्याने त्याबाबतची तक्रार उपनगराध्यक्ष दत्ता बनकर आणि नगरसेवक रवी पवार यांच्याकडेही केल्याचे सांगितले आहे.
Source link


