तोवर गॅस पाईपलाईनचे पुढील काम करू देणार नाही

नगरसेवक देव्या सूर्याजींचा एम .एन. जी .एल अधिकाऱ्यांना इशारा
सावंतवाडी : प्रतिनिधी
जोपर्यंत मागच काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढे काम करू देणार नाही असा इशारा नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला देत मोती तलाव भागात सुरू असणारे काम बंद करण्यास भाग पाडले. सालईवाडा भागातील ३ महिन्यांपासून खणून ठेवलेले रस्ते आधी सुस्थितीत आणा, तोवर गॅस पाईपलाईनच पुढचे काम करू देणार नाही असा इशारा श्री. सुर्याजी यांनी दिला.मोती तलाव परिसरात सुरू असणारे काम नगरसेवक श्री. सुर्याजी यांनी बंद पाडले . एमएनजीएल अधिकाऱ्यांना सोबत घेत येथील निंबाळकर पीर, कामत नगर, कळसुलकर स्कुल, दैवज्ञ मंदिर ते युको बँक परिसरातील झालेली रस्त्यांची दुरवस्था दाखवून दिली. चुकीच्या पद्धतीने रस्ते बुजविण्यात आल्याने लोकांना चालणे मुश्किल झाले आहे. रस्ते अरुंद असल्याने महिलांचे अपघात होत आहेत. त्यामुळे तातडीने रस्तावरील मातीचे ढीग रस्त्याच्या समांतर आणावे, मातीने बुजवलेले गटार सुस्थितीत आणून डांबरीकरण होईपर्यंत रस्त्यावर पाणी मारावे अशा सुचना त्यांना केल्या. यावेळी न.प.कडे खडीकरण व डांबरीकरणासाठीचे पैसे कंपनीकडून वर्ग करण्यात आले आहेत. ते काम नगरपरिषदकडून करण्यात येणार आहे. तर गॅस पाईपलाईनचे कंम्पलिवशन सर्टिफिकेट आज देण्यात येईल असे सांगितले. यावेळी नगरसेवक श्री. सुर्याजी यांनी मुख्याधिकारी यांना फोन करत खडेबोल सुनावले. जोपर्यंत खोदून ठेवलेले मार्ग सुस्थितीत आणले जात नाही, तोवर गॅस पाईपलाईनचे पुढील काम करू देणार नाही असा इशारा दिला. यावेळी मुख्याधिकारी यांनी आधी काम पूर्ण करा, नंतर पुढील काम सुरू करा असे आदेश फोनवरून कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी मेहर पडते, ॲड. प्रथमेश प्रभू, श्री. सावंत आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Source link

