दिल्ली कॅपिटल्सचा आरसीबीला दे धक्का

दिल्लीचा 6 गड्यांनी दणदणीत विजय : सामनावीर ट्रिस्टन स्टब्स, केएल राहुलची अर्धशतकी खेळी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीवर 7 गड्यांनी दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बेंगळूरने 20 षटकांत 8 गडी गमावून 175 धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्लीने 19.5 षटकांत 6 गडी राखून विजयी लक्ष्य गाठले. आपल्या तिसऱ्या विजयासह, डीसी गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे, तर आरसीबी 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, 47 चेंडूत 60 धावांची खेळी करत दिल्लीला विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या ट्रिस्टन स्टब्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रारंभी, दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीसाठी सलामीला विराट कोहली आणि फिल सॉल्ट मैदानात उतरले. मात्र कोहली 19 धावांवर लुंगी एन्गिडीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर देवदत्त पडिक्कल देखील 18 धावांवर परतला. दुसऱ्या टोकाला फिल सॉल्टने मात्र आक्रमक खेळी करत डाव सावरला. त्याने 38 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 63 धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली आणि संघासाठी सर्वाधिक धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांमध्ये रजत पाटीदार (8), टीम डेविड (26), जितेश शर्मा (14), रोमॅरियो शेफर्ड (1), कृणाल पांड्या (12) आणि भुवनेश्वर कुमार (3) यांनी छोटेखानी योगदान दिले. इतर आरसीबीच्या फलंदाजांनी मात्र निराशा केल्यामुळे त्यांना 20 षटकांत 8 बाद 175 धावापर्यंत मजल मारता आली. दिल्ली कॅपिटल्सकडून अक्षर पटेल, लुंगी एन्गिडी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. अक्षरने 3 षटकांत 18 धावा देत 2 बळी घेतले. याशिवाय मुकेश कुमार याने 4 षटकांत 32 धावा देत 1 विकेट घेतली.
केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्सची शानदार खेळी
आरसीबीने विजयासाठी दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्ससाठी केएल राहुल आणि पथुम निसंका यांनी डावाची सुरुवात केली. पण, भुवनेश्वर कुमारने एकाच षटकात दोन बळी घेत सलग तीन धक्के दिले. भुवनेश्वरने निस्संकाला 1 धावेवर, करुण नायरला 5 धावांवर आणि समीर रिझवीला 2 धावांवर बाद केले. यामुळे दिल्लीची 3 बाद 18 अशी स्थिती झाली होती. पण, या बिकट स्थितीत केएल राहुलने 6 चौकार आणि 2 षटकारांसह 34 चेंडूंमध्ये 57 धावा करत संघासाठी अर्धशतक झळकावले. राहुल व्यतिरिक्त, ट्रिस्टन स्टब्स आणि अक्षर पटेल यांनीही संघासाठी उत्कृष्ट खेळी केली. स्टब्सने 4 चौकार आणि 1 षटकारासह 47 चेंडूंमध्ये नाबाद 60 धावा केल्या. अक्षर पटेल 3 चौकारांसह 19 चेंडूंमध्ये 26 धावा करून दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला.
विशेष म्हणजे, शेवटच्या षटकांत दिल्लीला 6 चेंडूंत 15 धावा हव्या होत्या आणि आरसीबीने रोमारिओ शेफर्डला शेवटचे षटक दिले. त्याने पहिल्या 2 चेंडूंत प्रत्येकी 1 धाव दिली, पण डेव्हिड मिलरने तिसरा फुलटॉस चेंडू षटकार खेचला. त्यानंतर पुढील चेंडू कव्हरच्या वरून षटकार खेचून दिल्लीला विजय मिळवून दिला. मिलरने एक चौकार आणि दोन षटकारांसह 10 चेंडूंमध्ये 20 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने तीन बळी आणि कृणाल पांड्याने एक बळी घेतला.
Source link



