Uncategorized

Sangli Crime | कुपवाडमध्ये गुंडावर भरदिवसा दगडाने हल्ला; वाघमोडेनगर रस्त्यावर रक्ताचा सडा

                                       कुपवाडमध्ये दगडाने हल्ला

कुपवाड : कुपवाड शहरात पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर काहीजणांनी मिळून दगडाने हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी वाघमोडेनगर रस्त्यावर घडली. याबाबत कुपवाड पोलिसात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. हा हल्ला जुन्या वादावरून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

पोलिसांनी हल्ला करणाऱ्याचाशोध सुरू केला आहे. हल्ल्यात गणेश सदाशिव खोत (२८, रा.शांत कॉलनी कुपवाड) असे जखमी झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. जखमी गणेश खोत हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो शनिवारी दुपारी दुचाकीवरून वाघमोडेनगरच्या दिशेने जात होता. कोपऱ्याजवळ येताच काही अज्ञात हल्लेखोर पाठलाग करत आले. यावेळी त्यांच्यात जुन्या वाद उफाळला. याचवेळी हल्लेखोरांनी खोत यास मारहाण केली.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​