Uncategorized
Ratnagiri News | सालदुरेत स्टंटबाजी करताना कार फसली

पुणे येथील पर्यटकांची कार वाळूत फसली
दापोली : तालुक्यातील सालदुरे खाडीजवळ समुद्रावर स्टंटबाजी करत असताना पुणे येथील पर्यटकांची कार वाळूत फसली. यावेळी येथील ग्रामस्थांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे अनर्थ टळला. कारमध्ये लहान मुले, महिला, पुरुष पटक होते. दरम्यान, समुद्र किनाऱ्यावर स्टंटबाजी करणाऱ्या पर्यटकांवर आळा घालण्याची मागणी नागरिकांतून हाते आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून आलेले काही पर्यटक सालदुरे-दापोली खाडी परिसरात फिरत होते. यावेळी स्थानिक परिस्थितीचा अंदाज न घेता, चालकाने थेट खाडीच्या चिखलमय किनाऱ्यावर गाडी नेऊन स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळातच ही गाडी तिथल्या मऊ वाळूत आणि चिखलात रुतली.
गाडी बाहेर पडणे अशक्य झाल्याने गाडीत असलेल्या लहान मुलांचा, महिलांचा आणि पुरुषांचा जीव टांगणीला लागला. हा प्रकार लक्षात येताच सालदुरे येथील ग्रामस्थ निवेदन शेवडे, रुपेश शेवडे आणि विपुल शेवडे यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. खाडीला भरती लागण्याची वेळ जवळ आली असल्याने वेळ अत्यंत कमी होता.
ग्रामस्थांनी आधी गाडीतील लहान मुले, महिला आणि पुरुषांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर तब्बल तासाभराच्या अथक परिश्रमानंतर
चालू अवस्थेतील कार चिखलातून बाहेर काढली. ग्रामस्थांच्या या देवदूतासारख्या मदतीमुळे सुटकेचा श्वास सोडला.
Source link



