Uncategorized

Alcaraz, Sabalenka, Medvedev, Noskova in third round

जेसिका पेगुला, कॅरोलिन मुचोव्हा तिसऱ्या फेरीत, सोफिया केनिन, स्टीफन्स, बेरेटिनी, बोल्टर, नाकाशिमा पराभूत

वृत्तसंस्था/न्यूयॉर्क

2023 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूष विभागात स्पेनचा विद्यमान विजेता कार्लोस अल्कारेझ, रशियाचा आंद्रे मेदव्हेदेव, ऑस्ट्रेलियाचा अॅलेक्स डी मिनॉर, टिफोई, बेन शेल्टन यांनी तर महिलांच्या विभागात बेलारूसची टॉपसिडेड आर्यना साबालेंका, जेसिका पेगुला, कॅरोलिना मुचोव्हा यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. सोफिया केनिन, सेबेस्टीयन गोर्झेनी, इटलीचा मॅटेव बेरेटिनी, केटी बोल्टर, स्लोअन स्टिफेन्स यांचे आव्हान संपुष्टात आले.

पुरुष एकेरीत स्पेनच्या टॉपसिडेड अल्कारेझने जेमी फारीयाचा 4-6, 6-0, 6-3, 6-2 अशा चार सेटमधील लढतीत पराभव करत तिसरी फेरी गाठली. मात्र विद्यमान विजेत्या अल्कारेझला या लढतीत पहिला सेट गमवावा लागला होता. रशियाच्या डॅनियल मेदव्हेदेवने अमेरिकेच्या वाईल्ड कार्डधारक सेबेस्टीयन गोर्झेनीवर 6-1, 6-3, 7-5 अशी मात करत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. 2021 साली या स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या मेदव्हेदेवने 14 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली.

दुसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या अॅलेक्स मिचेल्सनने आपल्याच देशाच्या ब्रेन्डॉन नाकाशिमाचा 6-3, 6-4, 6-4, अमेरिकेच्या टिफोईने जपानच्या साकामोटोचा 6-3, 6-4, 6-4, अर्जेंटिनाच्या मारियानो नाव्होनेने इटलीच्या अनुभवी मॅटेव बेरेटिनीचा 3-6, 6-3, 6-4, 7-6 (7-4) अशा चार सेट्समधील लढतीत पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरने इटलीच्या आंद्रे ग्युरेरीचा 6-2, 6-2, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. अमेरिकेच्या आठव्या मानांकीत बेन शेल्टनने हुबर्ट हुरकेजचा 6-3, 5-7, 7-6 (7-3), 7-5 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली. चीनच्या युन चाओकेटीने स्पेनच्या 19 वर्षीय राफेल जोडारचे आव्हान 6-2, 6-1, 6-1 अशा सेट्समध्ये संपुष्टात आले.

महिलांच्या विभागातील दुसऱ्या फेरीतील सामन्यात बेलारूसच्या टॉप सिडेड आर्यना साबालेंकाने केवळ 53 मिनिटांत पोलीना लॅचेंकोचे आव्हान 6-1, 6-1 असे सहजपणे संपुष्टात आणत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत बुधवारी वारंवार होणाऱ्या पावसामुळे काही सामने उशीरा खेळविण्यात आले. अमेरिकेच्या जेसिकाऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी सोफिया केनिनने या स्पर्धेतील पहिल्या फेरीमध्ये अमेरिकेच्या  व्हिनस विलियम्सला पराभवाचा धक्का दिला होता. सातव्या मानांकीत कॅरोलिना मुचोव्हाने इंग्लंडच्या केटी बोल्टरचा 6-1, 6-0 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली.

गेल्या जुलैमध्ये झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत मुचोव्हाने उपविजेतेपद मिळविले होते. दुसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात मार्टा कोस्ट्युकने स्लोअन स्टिफेन्सचे आव्हान 6-1, 7-5 असे संपुष्टात आणले. स्टिफेन्सने 2017 साली अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. आता कोस्ट्युकचा तिसऱ्या फेरीतील सामना लैला फर्नांडीजबरोबर होणार आहे. विम्बल्डन विजेती लिंडा नोस्कोव्हाने थायलंडच्या तारारुडेचा 6-4, 6-2 असा फडशा पाडत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. झेकच्या नोस्कोव्हाने या स्पर्धेत आतापर्यंत दर्जेदार खेळाच्या जोरावर आपली वाटचाल पुढे सुरू ठेवली आहे. इमा नेव्हारोने कार्टी मॅक्नेलीचा 3-6, 6-2, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​