Uncategorized

India is the strong favorite to win against Pakistan.

भारताकडून आक्रमक खेळाची अपेक्षा,  फलंदाजीसह गोलंदाजीही भेदक ठरण्याची आशा, पाकच्या कामगिरीत सुधारणेची गरज

वृत्तसंस्था, दुबई : उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केल्यानंतर महिला आशिया चषकातील साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविऊद्ध खेळताना त्यांच्याहून अधिक सरस असलेल्या भारतीय संघाकडून आक्रमक खेळाची अपेक्षा आहे.

पुऊष असो वा महिला बहुसंघीय स्पर्धांमधील भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत मैदानाबाहेर जी मोठी चर्चा होते किंवा हवा निर्माण केली जाते, त्या तुलनेत प्रत्यक्ष सामन्यांचा दर्जा गेल्या काही काळापासून तितकासा उंचावलेला नाही. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर जेव्हा हे दोन संघ आमनेसामने येतील तेव्हाही यात काही वेगळे घडण्याची शक्यता कमीच आहे. कारण विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या भारताकडून पाकिस्तानचा सहज पराभव केला जाण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा नाही की, भारताला टी-20 प्रकारात काहीच सुधारणा करण्याची गरज नाही. कारण गेल्या दोन विश्वचषकांमध्ये भारताचे आव्हान लवकर संपुष्टात आलेले आहे.

तरीही आशियाई स्तरावर भारताच्या तोडीचा एकही संघ नाही. मागील स्पर्धेत भारत श्रीलंकेकडून पराभूत होऊन उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. दुसरीकडे, पाकिस्तानने थायलंडविऊद्धचा आपला पहिला सामना जिंकला असून ते अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून आहेत. सामन्यापूर्वी भारताच्या स्मृती मानधना व शफाली वर्मा या दोन्ही सलामीवीर उत्कृष्ट लयीत असल्याचे दिसून येत आहे. मानधनाने हाँगकाँगविऊद्धच्या सामन्यात एकाच वेळी अनेक विक्रम मोडीत काढत शानदार शतक झळकावले आणि स्पर्धेतील इतर संघांना धोक्याचा इशारा दिला. येथील खेळपट्ट्या फलंदाजीसाठी फारशा सोप्या नाहीत. खेळपट्टीचा वेग आणि स्थिती समजून घेण्यासाठी फलंदाजांना साधारणपणे 10 चेंडूंचा वेळ घ्यावा लागतो आणि त्यानुसार आपल्या डावाची आखणी करावी लागते. गुऊवारी रात्री मानधना आणि शफाली यांनी नेमके हेच केले.

प्रतिका रावल, रिचा घोष आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यासारख्या खेळाडूंना मैदानावर अधिक वेळ घालवण्याची इच्छा असेल, कारण त्यांना मिळालेल्या चांगल्या सुऊवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आलेले नाही. तिसऱ्या क्रमांकावर खेळणारी नवीन खेळाडू प्रतिका रावलवर दबाव वाढत आहे. एकदिवसीय प्रकारात भरपूर यश मिळवूनही तिला टी-20 प्रकारातील आव्हानांशी जुळवून घेता आलेले नाही. वेगवान गोलंदाजीच्या फळीत नंदिनी शर्माचा समावेश करणे हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल ठरले आहे. कारण प्रमुख गोलंदाज क्रांती गौडसोबत गोलंदाजीची सुऊवात करताना ती आपल्या क्षमतेनुसार चांगली कामगिरी करत आहे. दुसरीकडे, भारताशी स्पर्धा करण्यासाठी पाकिस्तानला त्यांच्या फलंदाजीमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज आहे. फलंदाजीतील उणिवांनी संघाला अनेक वर्षांपासून निराश केले आहे.

थायलंडविऊद्धच्या मागील सामन्यातही पाकिस्तानने पॉवरप्लेमध्ये तीन गडी गमावून दडपण आणले होते. तथापि, त्यांनी कमी प्रस्थापित बाजूविऊद्ध 119 धावांचा यशस्वीरीत्या बचाव केला. संघ सलामीवीर मुनीबा अली आणि अष्टपैलू फातिमा सना यांच्यावर अवलंबून आहे. सना ही संघाची कर्णधार देखील आहे.

सामन्याची वेळ : रात्री 8 वा.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​