Uncategorized

मालवणच्या श्री गणेश चित्रशाळेतील कलाकारांची खास कलाकृती; दशावताराच्या वेशातील साडेसहा फूट उंचीची गणेशमूर्ती मुंबईत विराजमान होणार

मालवण / प्रतिनिधी : कोकणातील पारंपरिक दशावताराच्या वेशभूषेतील सुमारे साडेसहा फूट उंचीची आकर्षक गणेशमूर्ती मालवण येथील हेमंत रामाडे यांच्या श्री गणेश चित्रशाळेत साकारण्यात आली आहे. गणेश चतुर्थीच्या पूजनासाठी ही कलाकृती मुंबईतील परेल तकदिर टेरेस मित्र मंडळाकडे रवाना करण्यात आली.

यंदाच्या गणेशोत्सवात श्री गणेश चित्रशाळेतून मुंबईला रवाना होणारी ही पहिली गणेशमूर्ती आहे. या मंडळासाठी यापूर्वीही चित्रशाळेने विविध संकल्पनांवर आधारित गणेशमूर्ती साकारल्या आहेत. 2010 मध्ये 2121 मोदकांची संकल्पना असलेली गणेशमूर्ती तयार करण्यात आली होती. त्यानंतर आयर्लंडमधील गार्डनमध्ये तबला वाद्य वाजविणाऱ्या स्वरूपातील गणेशमूर्तीची ऑर्डरही मंडळामार्फत देण्यात आली होती. कापसाच्या मोदकांची संकल्पना असलेली गणेशमूर्तीही याच चित्रशाळेत साकारण्यात आली आहे.

दशावतार आणि गणेशरूपाचा अनोखा संगम

यंदा परेल तकदिर टेरेस मित्र मंडळाने कोकणातील पारंपरिक दशावतार या विषयावर गणेशमूर्ती साकारण्याची संकल्पना मांडली होती. मंडळाच्या वतीने किशोर कांदळगांवकर यांनी ही संकल्पना मूर्तिकार हेमंत रामाडे यांच्यासमोर मांडली. त्यानुसार हेमंत रामाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्रितपणे ही कलाकृती साकारली.

ही मूर्ती तयार करण्यासाठी सुमारे सात ते आठ दिवसांचा कालावधी लागला. मूर्तीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी मूर्तिकार व सहकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. कोकणातील दशावताराची पारंपरिक ओळख आणि गणेशमूर्तीचे कलात्मक रूप यांचा सुरेख मिलाफ या मूर्तीत साधण्यात आला आहे.

मालवण येथून ट्रान्सपोर्ट वाहनाद्वारे ही गणेशमूर्ती मुंबईतील मंडळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्यात येणार आहे.

ही मूर्ती साकारण्यासाठी राकेश वेंगुर्लेकर, योगेश परब, हर्षद तळवडेकर, अतुल सांडव, सिद्धार्थ परब, गौरी मेस्त्री, निनाद आडकर, वैभव खूरदरे, साई दांडकर, योगिता रामाडे, दीप मुंबरकर, गौरांग कोचरेकर, पार्थ आचरेकर, दर्शन गांवकर, चेतन केनी, वेदिका प्रभू आणि हर्षद पाटकर यांचे सहकार्य लाभले. अशी माहिती मूर्तिकार हेमंत रामाडे यांनी दिली.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​