Uncategorized

मिरजमध्ये टोळी संघर्ष उफाळला

                                            मिरजमध्ये टोळी संघर्ष उफाळला

मिरज – टाकळी रस्त्यावरीलटोळीतील सदस्य शिव अथणीकर याच्यावर हल्ला झाल्यानंतर त्याच्या टोळीतील पाच संशयीत हत्यारे घेऊन फिरताना आढळून आले. पोलिसांनी या पाचही जणांना अटक करुन त्यांच्याकडून दोन कोयता, एक रॉ ड आणि दुचाकी जप्त केली आहे. अटक केलेल्यांमध्ये गोविंद सदाशिवराव नाईक (रा. दिंडीवेस, मिरज), रिहान तौफिक शिकलगार (रा. सतारमेकर गल्ली, मिरज), राजू अजीज मुल्ला (रा. दत्त कॉलनी, मिरज), अनिश अल्ताफ सौदागर (रा. शिंदे हॉलजवळ, सुभाषनगर) आणि अल्फाज अखिल मुल्ला (रा. अमननगर, मिरज) अशा पाचजणांचा समावेश आहे.

शिव अथणीकर या तरुणावर टाकळी रस्त्यावर हल्ला झाला होता. शहरातील मतिन काझीसह त्याच्या टोळीने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. काझी आणि अमननगर येथील एजाज शेख या टोळीमध्ये पूर्ववैमनस्यातून वाद आहेत. याच कारणातून काझी टोळीने शिव अथणीकर याच्यावर हल्ला केल्यामुळे अथणीकर हा शेख टोळीतील असल्यामुळे टोळीतील समर्थक बदला घेण्यासाठी काझी टोळीवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. सदरची माहिती मिळताच पोलिसांनी दिंडीवेस, मालगांव रस्ता व अमननगर या भागात संशयितांचा शोध घेतला. पाच जण दुचाकी सह थांबले होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​