Uncategorized

ऑफिसमध्ये चेहरा का लपवितात चिनी महिला?

सकाळी ऑफिसमध्sय पोहोचतेवेळी चेहरा अत्यंत ताजातवाना आणि चमकणारा तर संध्याकाळपर्यंत तोच चेहरा थकलेला, सुजलेला अन् निस्तेज दिसू लागल्यास काय वाटेल? चीनमध्ये सध्या अनेक महिला कर्मचारी याच समस्येला तोंड देत असल्याचा दावा करत आहेत. ऑफिसमध्ये अनेक तास काम केल्यावर त्वचा, डोळे आणि पूर्ण व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडत असल्याचे या महिलांचे सांगणे आहे.

याचमुळे चीनमध्ये काही महिला आता ऑफिसमध्ये काम करताना स्वत:चा चेहरा झाकून बसत आहेत. कुणी चेहऱ्यावर सनस्क्रीनचा जाड थर लावत आहेत, तर कुणी डेस्कवर छत्ती किंवा पॅरासोल लावून काम करत आहे. काही कर्मचारी सनहॅट घालत आहेत आणि काही पूर्ण चेहऱ्याला झाकणाऱ्या मास्कचा वापर करत आहेत.

सोशल मीडियावर यावरून एक नवा ट्रेंड सुरू असून त्याला लोक ‘ऑफिस एजिंग’ म्हणत आहेत. ऑफिसमध्ये दररोज दीर्घकाळापर्यंत राहिल्याने आपण वयापेक्षा अधिक वृद्ध दिसत आहोत असे त्यांचे म्हणणे आहे.

एक महिन्याच्या नोकरीतच बदलला चेहरा

पूर्व चीनच्या जियांग्सू प्रांताच्या एका सोशल मीडिया युजरने स्वत:ची समस्या शेअर केली. नोकरी सुरू करून एक महिना झाला असतानाच माझ्या चेहऱ्याचा रंग पूर्वीपेक्षा खूपच बदललेला दिसून येऊ लागला, तसेच डोळ्यांमध्ये अनेकदा थकवा अन् जळजळ यासारखी समस्या राहू लागल्याचे एका महिलेने सांगितले आहे. अन्य एका महिलेने सुटी घेऊन काही काळ ऑफिसपासून दूर राहिल्यावर माझा चेहरा पूर्वीपेक्षा अधिक साफ अन् गोरा दिसू लागल्याचा दावा केला.

ऑफिसमध्येच लावली छत्री

या तक्रारीनंतर काही चिनी कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या स्तरावर ‘उपचार’ही शोधला आहे. अनेक लोक स्वत:च्या डेस्कवर छोट्या छत्र्या लावू लागले. काही कर्मचारी ऑफिसच्या आत सन हॅट परिधान करून बसत आहेत. काही लोक चेहरा अन् हातांवर मोठ्या प्रमाणात सनस्क्रीन लावून काम करत आहेत. सोशल मीडियावर समोर आलेली छायाचित्रे अन् पोस्टमध्ये काही महिला चेहरा झाकून कॉम्प्युटरवर काम करताना दिसून येतात. त्यांचा उद्देश ऑफिसमधील प्रकाश अन्  इतर पर्यावरणीय कारणांपासून स्वत:च्या त्वचेचे संरक्षण करणे आहे.

ऑफिसचे पूर्ण वातावरण जबाबदार

अनेक ऑफिसमध्ये कूल-टोन लायटिंगचा वापर केला जातो, ज्याचा उद्देश कर्मचाऱ्यांना अधिक वेळेपर्यंत सक्रीय अन् सतर्क ठेवणे असतो. यामुळे काम करण्याची क्षमता वाढू शकते असे मानले जाते. परंतु समस्या केवळ ऑफिसच्या लाइटपुरती मर्यादित नाही असे चीनचे एक लायटिंग डिझाइनर योकी यांनी सांगितले आहे. ऑफिसमधील कोरडी हवा, धूळयुक्त व्हेंटिलेशन सिस्टीम आणि खोलीत वाढता कार्बन डायऑक्साइडचा स्तर देखील कर्मचाऱ्यांसाठी समस्यादायक असू शकतो. दीर्घकाळापर्यंत अशा वातावरणात काम केल्याने शरीरात थकवा आणि बेचैनी वाढू शकते.

सिक बिल्डिंग सिंड्रोम

ऑफिसच्या वातावरणामुळे होणाऱ्या समस्यांना समजून घेण्यासाठी वैद्यकीय जगतात ‘सिक बिल्डिंग सिंड्रोम’ शब्दाचा वापर करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने 1980 च्या दशकात ही संज्ञा मांडली होती. याचा अर्थ अशास्थितीशी आहे, ज्यात एखाद्या खास इमारत किंवा ऑफिसमध्ये अधिक वेळ घालविण्यादरम्यान लोकांना डोकेदुखी, नाक बंद होणे, त्वचा कोरडी होणे, गळ्यात जळजळ, थकवा आणि एकाग्रतेत समस्या यासारख्या समस्या होऊ शकतात. ऑफिसमधून बाहेर पडल्यावर अनेक लोकांना दिलासा वाटू लागतो ही खास बाब आहे. अशा समस्या आधुनिक इमारतींच्या वाढत्या चलनासोबत जोडलेल्या आहेत. ऊर्जा वाचविण्यासाठी अनेक इमारतींना एअरटाइट करण्यात आले. यामुळे उष्णता आणि थंडीला आत राखण्यास मदत मिळाली, परंतु अनेक ठिकाणी ताज्या हवेचा प्रवाह कमी झाला. चीनमध्ये ‘ऑफिस एजिंग’चा मुद्दा आता केवळ आरोग्यापुरती मर्यादित नाही, ऑफिसला जाणाऱ्या महिलांनी स्वत:च्या लुकवरूनही चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​