Uncategorized

तेजस्वी यादव राजकारणातून निवृत्त ?

वर्षाकालीन अधिवेशनातून गायब, चर्चेला उधाण 

► वृत्तसंस्था

पाटणा

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे राजकारणातून निवृत्त होणार आहेत काय, या विषयावर सध्या तेथील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. बिहारमध्ये सध्या विधानसभेचे वर्षाकालीन अधिवेशन होत आहे. तथापि, तेजस्वी यादव एक दिवसही या अधिवेशनाकडे फिकरलेले नाहीत. तसेच ते पक्षाच्या कार्यातही फारसा रस घेत नाहीत, अशी स्थिती दिसून येत आहे. बिहारच्या स्थानिक राजकारणात ते एका नव्या पक्षाला पुढे येण्याची संधी देत आहेत, की काँग्रेसला ‘वॉकओव्हर’ देत आहेत, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. सध्या बिहारच्या राजकारणात बरेच मोठे परिवर्तन घडताना दिसत असून त्याची उत्सुकता आहे.

बिहारच्या राजकारणात मांडण्यासारखे मुद्दे त्यांच्याकडे अनेक आहेत. ते विधानसभेत किंवा विधानसभेबाहेर या मुद्द्यांवर जोरदार आवाज उठवू शकतात. बिहारमध्ये त्यांचा राष्ट्रीय जनता दल हा पक्ष सध्या तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षाला गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मतेही पुष्कळ मिळाली होती. तरीही ते इतके निष्क्रीय का आहेत, याचे त्यांच्या निकटवर्तीयांनाही आश्चर्य वाटत आहे. ते फारसे लोकांमध्ये मिसळण्यासही उत्सुक दिसत नाहीत.

दिल्लीत अधिक काळ वास्तव्य

तेजस्वी यादव हे बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. तथापि, त्यांचे वास्तव्य दिल्लीतच अधिक काळ असते, अशी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची तक्रार आहे. त्यांचे पिता आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव हे आजारी असून दिल्लीत उपचारांसाठी वास्तव्यास आहेत. त्यांची सेवा करण्यासाठी तेजस्वी यादव दिल्लीत अधिक काळ असतात, असे बोलले जाते. तथापि, विधानसभा अधिवेशन काळातही ते पाटणा इथे नव्हते, हे आश्चर्य मानले जाते.

सत्ताधाऱ्यांना संधी

तेजस्वी यादव अधिवेशन काळातही विधानसभेत उपस्थित नव्हते. यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार करण्याची संधी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील इतर पक्षांना मिळत आहे. बिहारचे कृषी मंत्री विजय कुमार सिन्हा यांनी अनेकवेळा यासंबंधी विधानसभेत विचारणा केली. तथापि, राष्ट्रीय जनता दलाचे इतर आमदार समाधानकारक प्रत्युत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे तेजस्वी यादव यांच्या राजकीय भवितव्याविषयी चर्चा केली जात आहे. त्यामुळेच ते कोणत्या नव्या पक्षाला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत, की काँग्रेसला पुढे येऊ देण्याची व्यवस्था करीत आहेत, असा प्रश्न आता त्यांचे कार्यकर्तेच विचारतात.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​