Uncategorized

“माडखोलमध्ये कृष्णा राऊळ यांची सामाजिक बांधिलकी; शाळेला स्पीकर, मठाला इन्व्हर्टर-बॅटरी अन् माजी सैनिकांचा सन्मान”

सावंतवाडी / प्रतिनिधी : माडखोल गावचे उपसरपंच तथा माडखोल सेवा संस्था सोसायटीचे चेअरमन कृष्णा राऊळ यांनी सामाजिक बांधिलकी जपत गावातील विविध संस्थांना आणि घटकांना आवश्यक साहित्य भेट देत अनोखा सामाजिक उपक्रम राबविला. त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

माडखोल प्राथमिक शाळा क्रमांक 1 मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच सांस्कृतिक उपक्रमांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शाळेला ब्लूटूथ स्पीकर भेट देण्यात आला. शाळेतील विविध कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेसाठी या साहित्याचा उपयोग होणार आहे.

यासोबतच माडखोल येथील श्री स्वामी समर्थ मठाला इन्व्हर्टर आणि बॅटरी भेट देण्यात आली. वीजपुरवठा खंडित झाल्यास मठातील आवश्यक कामकाज सुरळीत सुरू राहण्यास या सुविधेचा उपयोग होणार आहे.

या सामाजिक उपक्रमांतर्गत गावातील माजी सैनिकांचाही सन्मान करण्यात आला. देशसेवेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या माजी सैनिकांना हुतात्मा स्मारकांच्या प्रतिमा भेट देऊन त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्राला हातभार लावतानाच माजी सैनिकांचा सन्मान करण्याच्या या उपक्रमातून कृष्णा राऊळ यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थ, माजी सैनिक तसेच संबंधित संस्थांकडून स्वागत करण्यात आले. या उपक्रमाला मिळालेले प्रेम, शुभेच्छा आणि सहकार्याबद्दल कृष्णा राऊळ यांनी आपल्या मित्रपरिवारासह सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​