Uncategorized
प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रिपदाचा कार्यभार

कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी यांची नवीन शिक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सध्याच्या खात्यांव्यतिरिक्त त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारीही असेल. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी भारतीय संविधानाच्या कलम 75 च्या खंड (2) अन्वये धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. तसेच प्रल्हाद जोशी यांच्याकडे त्यांच्या सध्याच्या खात्यांव्यतिरिक्त शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यालाही राष्ट्रपतींनी सहमती दर्शवली आहे. प्रल्हाद जोशी यांच्याकडे सध्या अन्न व ग्राहक व्यवहार खाते होते. आता त्यांच्याकडे त्या खात्याव्यतिरिक्त शिक्षण मंत्रालयही सोपवण्यात आले आहे.
Source link



