Uncategorized

कर्णधार ईशान किशनचे नाबाद शतक

अभिमन्यू ईश्वरन, शिखर मोहन, कुशाग्र यांची अर्धशतके, पूर्व विभाग 4 बाद 385

वृत्तसंस्था, चेन्नई

2026 च्या क्रिकेट हंगामातील येथे खेळविण्यात येत असलेल्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर कर्णधार ईशान किशनचे नाबाद शतक तसेच अभिमन्यू ईश्वरन, शिखर मोहन आणि कुमार कुशाग्र यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पूर्व विभागाने पहिल्या डावात 4 बाद 385 धावा जमविल्या. वैभव सूर्यवंशीने 37 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 44 धावांची खेळी केली.

या अंतिम सामन्यात पूर्व विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर पूर्व विभागाने दमदार फलंदाजीचे दर्शन दिवसभराच्या खेळात घडविले. वैभव सूर्यवंशी आणि ईश्वरन या सलामीच्या जोडीने 14.4 षटकात शतकी भागिदारी केली. सूर्यवंशी बाद झाल्यानंतर ईश्वरन आणि शिखर मोहन यांनी संघाला सुस्थितीत नेले. ईश्वरनने 86 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 72 धावांची खेळी केली. उपाहारावेळी पूर्व विभागाने 27 षटकात 2 बाद 133 धावा जमविल्या होत्या.

दुसऱ्या सत्रामध्ये सुदीपकुमार घरामी केवळ 6 धावांवर बाद झाला. त्यानंतर शिखर मोहन आणि कर्णधार ईशान किशन यांनी दमदार फलंदाजी करताना चौथ्या गड्यासाठी 94 धावांची भागिदारी केली. चहापानापूर्वी शिखर मोहन मिलिंदच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 120 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह 85 धावा झळकाविल्या. खेळाच्या दुसऱ्या सत्रात पूर्व विभागाने 113 धावांची भर घालताना 2 गडी गमविले. चहापानावेळी पूर्व विभागाने पहिल्या डावात 54 षटकात 4 बाद 246 धावा जमविल्या होत्या.

ईशान किशनचे शतक

खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये पूर्व विभागाने एकही गडी न गमाविता 139 धावांची भर घातली. पहिल्या दिवसाअखेर पूर्व विभागाने 79 षटकात 4 बाद 385 धावा जमविल्या होत्या. ईशान किशनने 122 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांसह शतक झळकाविले. तर कुशाग्रने 67 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. ईशान किशन 111 तर कुशाग्र 63 धावांवर खेळत होते. या जोडीने पाचव्या गड्यासाठी अभेद्य 144 धावांची भागिदारी केली आहे. दक्षिण विभागातर्फे मिलिंदने 56 धावांत 2 तर विजयने 1 गडी बाद केला. पूर्व विभागाचा कर्णधार ईशान किशनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा ओलांडला असून त्याने या प्रकारात आपले 10 वे शतक झळकाविले आहे. ईश्वरनने अर्धशतक नोंदवून आपला 31 वा वाढदिवस साजरा केला.

संक्षिप्त धावफलक – पूर्व विभाग प. डाव 79 षटकात 4 बाद 385 (ईश्वरन 72, सूर्यवंशी 44, शिखर मोहन 85, ईशान किशन खेळत आहे 111, कुशाग्र खेळत आहे 63, मिलिंद 2-56, विजय 1-114).


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​