Uncategorized

मालवण तालुक्यात विकासकामांना 3 कोटी 59 लाखांचा निधी मंजूर

मालवण: मालवण तालुक्यातील विविध गावांमध्ये मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी जनसुविधा आणि नागरी सुविधा योजनेंतर्गत विविध विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांसाठी सुमारे 3 कोटी 59 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील प्रलंबित विकासकामांना गती मिळणार आहे.

तालुक्यातील नागरिकांना आवश्यक असलेल्या सार्वजनिक सुविधा आणि विविध नागरी कामांसाठी स्थानिक पातळीवरून मागण्या करण्यात आल्या होत्या. शिवसेना शाखाप्रमुख, विभागप्रमुख, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, तालुकाप्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच आजी माजी पदाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या कामांचा पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली.

विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्या माध्यमातून जनसुविधा आणि नागरी सुविधा योजनेंतर्गत विविध कामांना मंजुरी मिळवून देण्यात आली आहे. या निधीतून तालुक्यातील विविध गावांमध्ये आवश्यक मूलभूत आणि नागरी सुविधांची कामे करण्यात येणार आहेत.

विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे आणि विनायक बाईत यांनी आभार मानले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​