Uncategorized

Solapur News : ५२ लाखांसाठी विवाहितेचा छळ 

सोलापूर : नवीन जागा खरेदी करण्यासाठी माहेरून ५२ लाख रुपये आणावेत, अशी मागणी करत विवाहितेला मारहाण, शिवीगाळ व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्वेता सभांरभ (वय ४०, रा. मार्कंडेय सोसायटी, नवीन वालचंद महाविद्यालयासमोर, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती श्रीनू सभांरभ, सासू कांचना, सासरे पुरुषोत्तम तसेच स्वरूपा श्रीहरी चिट्ट्याल (सर्व रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, २०१० ते २०२६ या कालावधीत पद्मानगर परिसरात हा प्रकार घडला. विवाहानंतर फिर्यादीला संसारोपयोगी साहित्य, सोने तसेच इतर वस्तू देण्यात आल्या नसल्याचा आरोप आहे. तसेच योग्य मानपान न करता घरातील किरकोळ कारणांवरून वारंवार अपमानित करण्यात येत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, नवीन जागा खरेदी करण्यासाठी माहेरून ५२ लाख रुपये आणण्याची मागणी करत आरोपींनी शिवीगाळ व मारहाण केली. 
मागणी पूर्ण न केल्यास घटस्फोट देण्याची धमकीही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे फिर्यादीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​