Uncategorized

ताहीर हुसेनला शुक्रवारी शिक्षा सुनावणार अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्याचा युक्तिवाद

► वृत्तसंस्था नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांनी आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी न्यायालय आता शुक्रवार, 31 जुलै रोजी आरोपींना शिक्षा ठोठावणार आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन याच्यासह पाच दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

दिल्लीच्या करकरडूमा न्यायालयात सोमवारी शिक्षेवर युक्तिवाद झाला. आरोपींनी हा गुन्हा अत्यंत क्रूर आणि घृणास्पद पद्धतीने केला आहे. हा एक पूर्वनियोजित कट होता, असा युक्तिवाद पोलिसांच्यावतीने करण्यात आले. तर, बचाव पक्षाने प्रत्येक प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावली जाऊ शकत नाही, असा प्रतियुक्तिवाद केला.

या प्रकरणात 91 साक्षीदारांची तपासणी केल्यानंतर न्यायालयाने 11 आरोपींपैकी केवळ सहा जणांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने आता शिक्षेसाठी 31 जुलै ही तारीख निश्चित केली आहे. 13 जुलै रोजी करकरडूमा न्यायालयाने ताहिर हुसेन, नाझिम, कासिम, अनस आणि जावेद यांना खून, अपहरण, दंगल आणि जातीय सलोखा बिघडवल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते. 11 आरोपींपैकी सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​