Uncategorized
कसबा तारळेतील संत गजानन महाराज मंदिरात चोरी;

कसबा तारळे ( लक्ष्मण पाटील ) – कसबा तारळे येथील श्री संत गजानन महाराज मंदिर येथे अज्ञात चोरट्याने चांदीच्या 150 ग्रॅम व 100 ग्रॅम वजनाच्या गणपतीच्या मूर्ती अज्ञात चोरट्याने लंपास केल्या असून त्यांचे अंदाजे किंमत 25 हजार रुपये आहे सदर चोरीची फ्रियाद श्री संत गजानन महाराज मंदिराचे पुजारी बळवंत सायेकर यांनी राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये केली आहे
अज्ञात चोरट्याने गाभाऱ्याच्या लोखंडी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला व श्री संत गजानन महाराज यांचे संगमरवरी मूर्ती समोरील ठेवलेल्या चांदीच्या दोन गणपतीच्या मूर्ती लंपास केल्या सदर चोरट्यांचा सीसीटीव्ही फुटेज कैद झाले असून चोरट्यांचा शोध राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित शीद यांचे मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल देसाई व तारडे करत आहेत
Source link



