Indigo Emergency Landing राजकोटमध्ये इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग

► वृत्तसंस्था अहमदाबाद
दुबईहून मुंबईला येणाऱ्या इंडिगो विमानाचे सोमवारी गुजरातमधील राजकोट येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या लँडिंगनंतर विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात धूर दिसल्याने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या आपत्कालीन स्थितीवेळी विमानतळाच्या धावपट्टीवर आपत्कालीन सुरक्षा प्रोटोकॉल सक्रिय करण्यात आले होते.
आपत्कालीन लँडिंगची माहिती मिळताच राजकोट विमानतळ प्रशासन तात्काळ सतर्क झाले. याशिवाय, स्थानिक प्रशासनही सतर्क झाले होते. राजकोट अग्निशमन विभागाची अनेक वाहने आणि पाण्याचे टँकर विमानतळाच्या धावपट्टीवर तैनात करण्यात आले होते.
प्रवाशांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथक, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारीही विमानतळावर उपस्थित होते. मात्र, सुदैवाने कोणतीही मोठी आपत्ती न घडल्याने इंडिगो प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
Source link


