Rohini Paradhye | सोशल मीडिया हादरला! मंगळवेढ्यातील प्रसिद्ध रिलस्टार रोहिणी पाराध्ये यांची गळफास घेऊन आत्महत्या

मंगळवेढ्यात रिलस्टार रोहिणी पाराध्ये यांची आत्महत्या
मंगळवेढा – मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे सोशल मीडियावर विविध रील्समुळे लोकप्रिय झालेल्या रिलस्टार रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळउडाली असून सोशल मीडियावरही हळहळ व्यक्त केली जात आहे.
अज्ञात कारणावरून रोहिणी पाराध्ये यांनी ब्रह्मपुरी येथील “हॉटेल ग्रामपंचायत “च्या स्वयंपाकघरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना मंगळवारी दुपारी सुमारे अडीच बाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.या प्रकरणी पती निलेश पाराध्ये यांनी पोलिसात खबर दिली आहे.घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
निलेश पाराध्ये यांनी तत्काळ रोहिणी यांना उपचारासाठी मंगळवेढा ग्रामीणरुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.रोहिणी आणि निलेश पाराध्ये हे पती-पत्नी गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक विषय, विनोदी प्रसंग तसेच खाद्यपदार्थांवरील रील्स तयार करून सोशल मीडियावर लोकप्रिय झाले होते. त्यांच्या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत होता. सोशल मीडियावरील लोकप्रियतेचा फायदा घेत त्यांनी
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत ब्रह्मपुरी येथे “हॉटेल ग्रामपंचायत” हा व्यवसाय सुरू केला होता. अल्पावधीतच या हॉटेलला चांगला प्रतिसाद मिळू लागला होता.
व्यवसाय स्थिरावत असताना तसेच नवीन शाखा सुरू करण्याचे नियोजन सुरू असतानाच रोहिणी यांच्या आत्महत्येच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Source link



