News SP Kolhapur | पडद्यामागे राहून काम करण्यावर माझा भर’; पदभार स्वीकारल्यानंतर एसपी नीलोत्पल यांची पहिली प्रतिक्रिया

कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी नीलोत्पल विराजमान
कोल्हापूर – . कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस प्रमुख नीलोत्पल यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला..पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारतात त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व विभागांची पाहणी केली..त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला..
तक्तालीन पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांची पदोन्नतीपर गडचिरोलीला बदली झाल्यानंतर कोल्हापुरच्या पोलीस अधिक्षक पदावर नीलोत्पल यांची नियुक्ती झाली आहे..दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकरणांची मी सध्या माहिती घेत आहे..पडद्यामागे राहून काम करण्याची माझी पद्धत आहे.. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आपण चांगलं काम करू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
.शिवाय आमदार संजय गायकवाड यांच्याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीबाबत मला माहिती नाही..याबाबत सविस्तर माहिती घेऊन बोलेन मात्र या प्रकरणामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेऊ अशी प्रतिक्रिया देखील जिल्हा पोलीस प्रमुख नीलोत्पल यांनी दिलीये..तसचं कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल.. पोलीस दलातीलही कुणी अधिकारी, कर्मचारी चुकल्यास गय करणार नसल्याचं जिल्हा पोलीस प्रमुख नीलोत्पल यांनी स्पष्ट केलंय..
Source link



