कनिष्ठांची राष्ट्रीय हॉकी स्पर्धा आजपासून

वृत्तसंस्था, कोईमत्तूर
मंगळवारपासून येथे हॉकी इंडियाच्या 16 व्या कनिष्ठ पुरूषांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत विविध राज्यांचे संघ जेतेपदासाठी सज्ज झाले आहेत. सदर स्पर्धा 8 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
या स्पर्धेत 12 संघांचा समावेश असून ते चार गटामध्ये विभागण्यात आले असून प्रत्येक गटात 3 संघांचा समावेश आहे. अ गटामध्ये हरियाणा, मध्यप्रदेश, यजमान तामिळनाडू, ब गटात ओडिशा, मणिपूर, दादरा-नगर-हवेली दिव-दमण, क गटामध्ये पंजाब, झारखंड, दिल्ली तर ड गटामध्ये उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि बंगाल यांचा समावेश आहे. प्राथमिक फेरीच्या टप्प्यानंतर प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. या फेरीतील सामने 5 ऑगस्टला तर उपांत्य फेरीचे सामने 6 ऑगस्टला तसेच 8 ऑगस्ट रोजी अंतिम सामना तर तिसऱ्या स्थानासाठीचा प्लेऑफ सामना होणार आहे. अ विभागातील शेवटच्या दोन संघांची पदावनती होणार असून त्यांचा ब गटात समावेश राहील.
ब विभागामध्ये 10 संघांचा समावेश आहे. या विभागात अ गटात महाराष्ट्र, उत्तराखंड, जम्मू-काश्मिर, हिमाचलप्रदेश आणि केरळ तर ब गटात आंध्रप्रदेश, चंदीगड, अरुणाचलप्रदेश, बिहार, छत्तीसगड यांचा समावेश आहे. या विभागातील प्रत्येक गटातील आघाडीच्या दोन संघांना अ गटात प्रवेश करण्याची संधी मिळू शकेल तर शेवटच्या दोन संघांचा क गटात समावेश होईल.
क विभागामध्ये एकूण 8 संघांचा समावेश असून ते दोन गटात विभागण्यात आले आहेत. अ गटामध्ये आसाम, गोवा, राजस्थान, मिझोराम तर ब गटात तेलंगणा, पुडुचेरी, गुजरात आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे. या गटातील पहिल्या दोन संघांचा ब गटात प्रवेश होईल.
Source link



