Uncategorized
डॉ. किरण ठाकुर यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार

नाशिक येथे आज वितरण सोहळा
बेळगाव : नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने देण्यात येणारा कै. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक, तसेच लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांना जाहीर झाला आहे. शुक्रवार दि. 24 रोजी सायंकाळी 6 वा. सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, दिल्लीचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे उपस्थित राहणार आहेत. डॉ. किरण ठाकुर यांनी बेळगाव ‘तरुण भारत’ची धुरा स्वीकारल्यानंतर आवृत्तीचा विस्तार केला. आज बेळगाव, गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सोलापूर, मुंबई येथून ‘तरुण भारत’ नियमित प्रकाशित होतो.
Source link



