Uncategorized

​NEET पेपरफुटी प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे ओरोस येथे जोरदार आंदोलन

​ओरोस (प्रतिनिधी) : देशातील शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेली अनागोंदी आणि ‘नीट’ (NEET) पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
​याशिवाय, आंदोलक विद्यार्थी व युवकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेचा तीव्र निषेध नोंदवत गृहमंत्री अमित शाह यांच्याही राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली.
​जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​