Mayawati’s Mantra for Victory to Party Workers for 2027

वृत्तसंस्था/ लखनौ
बसप प्रमुख मायावती यांनी 2027 च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीवरून रविवारी लखनौमध्ये बहुजन समाज पक्षाची मोठी समीक्षा बैठक घेतली आहे. बैठकीत बूथस्तरापासून जिल्हा, विधानसभा आणि राज्य स्तरीय पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले होत. मायावतींनी निवडणुकीच्या तयारीत कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नसल्याचे सांगत संघटनेला पूर्णपणे सक्रीय आणि मजबूत करावे लागणार असल्याचा संदेश नेते आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.
पक्षाला बूथस्तरापर्यंत आणखी मजबूत करण्यात यावे, सर्व घटकांदरम्यान जनाधार वाढविण्यात यावा तसेच निवडणुकीसाठी आर्थिक सहकार्य जमविण्यावर विशेष लक्ष देण्यात यावे असा निर्देश मायावती यांनी दिला आहे. विरोधी पक्षांच्या प्रत्येक राजकीय कट आणि भ्रामक प्रचाराला मजबुतीने प्रत्युत्तर द्यावे लागेल. सद्यकाळात देशात राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थिती योग्य नसल्याचा दावा मायावती यांनी केला आहे. तसेच त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना 2007 प्रमाणे पूर्ण शक्तिनिशी निवडणूक लढविण्याचे आवाहन केले आहे.
Source link



