Uncategorized

जिल्ह्यातील 5 लाखांवर मतदार वगळले

35 हजार 93 हजार मतदार : 23 नेव्हेंबरअखेर आक्षेप-हरकतींसाठी अर्ज करा :  सर्वाधिक उत्तर मतदारसंघातील नावे वगळली

प्रतिनिधी/ बेळगाव

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली एसआयआर मोहीम यशस्वीरित्या पार पडली असून सोमवार दि. 24 रोजी जिल्ह्यातील 18 मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी प्रत्येक ग्रा. पं. स्तरावर सूचना फलकावर प्रसिद्ध करण्याची सूचना देण्यात आली असून नागरिकांनी यादी पाहून आपले नाव आहे की नाही याची माहिती घ्यावी. एसआयआरपूर्वी जिल्ह्यात एकूण 41 लाख 7 हजार मतदार होते. प्रक्रियेनंतर 35 लाख 93 हजार 561 पात्र मतदारांची ओळख करण्यात आली असून 5 लाख 13 हजार 439 मतदारांना वळगण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणाले, यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आक्षेप व हरकतींसाठी 6, 6ए, 7 व 8 क्रमांकाचा अर्ज बीएलओंकडे द्यावा. मतदारांनी 23 सप्टेंबरअखेर आपले अर्ज देणे बंधनकारक आहे. कोणीही मतदारयादीत नाव आले नाही म्हणून घाबरण्याची आवश्यकता नसून सतर्क राहण्याची गरज आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पात्र मतदार मतदानापासून वंचित ठेवण्यात येणार नाही. यासाठी मतदारांनी लवकरात लवकर अर्ज बीएलओंकडे सुपूर्द करावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात 41 लाख 7 हजार मतदारांपैकी 35 लाख 93 हजार 561 पात्र मतदारांची ओळख करण्यात आली असून यामध्ये 18 लाख 5 हजार 685 पुरुष, 17 लाख 87 हजार 715 महिला तर 161 तृतीयपंथी मतदार आहेत. एकूण मतदारांपैकी 5 लाख 13 हजार 439 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यामध्ये 1 लाख 34 हजार 903 मृत्यू, 26 हजार 459 शोध न लागलेले, 2 लाख 83 हजार 249 मतदारांनी कायमस्वरुपी स्थलांतर केले असून 222 इतर मतदार आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

जिल्ह्यात 84 हजार 422 मतदारांपैकी काही नावांमध्ये विविध कारणांनी गोंधळ व काही मतदारांचे मॅपिंग झालेले नाही. यामध्ये 47 हजार 646 मतदारांची नावांमध्ये गोंधळ असून जन्म तारीखाही वेगळ्या दर्शवित आहेत. तसेच 36 हजार 476 मतदारांचे मॅपिंग झालेले नाही. त्यांना जिल्हा प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात येणार असून ही प्रक्रिया 22 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या नोटिसीला कोण उत्तरे देणार नाही किंवा प्रतिसाद देणार नाही, त्यांची नावे मतदारयातून वगळली जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

बॉक्स करणे

अबब दीड लाखांवर मतदार वगळले

जिल्ह्यातील 5 लाख 13 हजार 439 मतदारांची वगळण्यात आली असून बेळगाव उत्तर, दक्षिण व ग्रामीण मतदारसंघातील एकूण 1 लाख 54 हजार 344 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक उत्तर 64 हजार 306, दक्षिण 59 हजार 182 तर ग्रामीण मतदारसंघातील 30 हजार 856 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

नवे 119 मतदान केंद्रे

मतदारसंख्येनुसार जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. यापूर्वी 4525 केंद्रे होते. यामध्ये नव्याने 119 केंद्रांची संख्या वाढविण्यात आली असून जिल्ह्यात मतदार केंद्रांची संख्या 4644 झाली आहे. नागरिकांनी आपले नाव आले आहे की नाही याची पडताळणी करावी. नाव आले नसल्यास बीएलओंशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंग उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​