Uncategorized

Kolhapur Weather | कोल्हापूरला मान्सूनपूर्व पावसाचा दिलासा! विजांच्या कडकडाटासह पहाटे कोसळल्या जोरदार सरी

                अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्म्यापासून कोल्हापूरकरांना सुटका

कोल्हापूर : जिल्हयात मान्सुनपूर्वपाऊस हजेरी लावत असल्याने तापमानात घट होत आहे. शहरासह जिल्हयात काही ठिकाणी रविवारी पहाटे चार वाजता विजांच्या कडकडाटासह पावसाने चांगलीच हजेरी लावली. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. समुारे तासभर पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.

रविवारी पहाटे झालेल्या मानसुनपूर्व पावसाने उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना सुखद गारव्याचा आनंद दिला. रविवारी दुपारचा काहीकाळ वगळता दिवसभर उष्णतेचा पारा कमीपारा ३४ अंशावरजिल्हयात रविवारी पहाटे पावसाची हजेरीअसल्याचे जाणवले. गत दोन महिन्यापासून तापमानाने उच्चांक गाठला होता.

अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्म्याने नागररिकांना हैराण करून सोडले होते. सध्या मात्र, वातावरणात बदल झाला असुन तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे.जिल्हयातील काही भागात मान्सुनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे. तसेच सकाळी व सायंकाळी ढगाळ वातावरण होत असल्याने हवेत गारवा निर्माण होत आहे. शेतकरी वर्ग सध्या मशागतीच्या कामात व्यस्त आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​