Uncategorized

Bought a ghost town

अमेरिकेत एका इसमाने निर्जन ठरलेल्या जुन्या मायनिंग टाउनला स्वत:च्या आयुष्यभराच्या कमाईतून खरेदी केले आहे. आता तो या घोस्ट टाउनमधील जुन्या इमारतींना सावरतअ सून लोकांना तेथे फिरण्यासाठी आमंत्रित करत आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सेरो गार्डो शहर  कधीकाळी चांदीच्या खाणींसाठी प्रसिद्ध होते आणि येथे हजारो लोक राहत होते. परंतु कालौघात हे शहर निर्जन ठरले. आता येथे पुन्हा झगमगाट परत आणण्याचा प्रयत्न अमेरिकन उद्योजक ब्रेंट अंडरवूड करत आहेत.

14 लाख डॉलर्समध्ये खरेदी

ब्रेंट अंडरवूड यांनी 2018 साली स्वत:च्या आयुष्यभरातील बचतीतील सुमारे 1.4 दशलक्ष डॉलर्स खर्च करत सेरो गोर्डो शहर खरेदी केले होते. हे शहर कॅलिफोर्नियात लोन पाइननजीक आहे. अंडरवूड यांना बालपणापासून इतिहास अन्  ओल्ड वेस्टच्या कहाण्यांमध्ये उत्सुकता होती. बालपणी मी आजोबांसोबत गन स्मोक पहायचो, जुन्या अमेरिकन वेस्टच्या कहाण्या आणि त्या काळातील जीवनाने मला नेहमीच आकर्षित केल्याचे अंडरवूड सांगतात. हाच छंद त्यांना सेरो गोर्डोपर्यंत आणणारा ठरला. 2020 मध्ये ते स्थायी स्वरुपात येथे रहायला आले, आता ते या पूर्ण भागाला पुन्हा सावरण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

कधीकाळी 4 हजार लोकांचे वास्तव्य

या शहराचे नाव स्पॅनिश भाषेतून आले आहे, ज्याचा अर्थ ‘मोठा पर्वत’ असा होतो. 1865 साली येथे चांदी, शिसे अन् झिंकचा शोध लागला होता. यानंतर हा भाग अत्यंत वेगाने मायनिंग टाउनमध्ये बदलला, खाणींमध्ये काम करण्यासाठी मोठ्या संख्येत लोक येथे पोहोचू लागले. स्वत:च्या सर्वात चांगल्या काळात या शहरात 4 हजाराहून अधिक खाणकामगार राहत होते. येथील चांदीच्या खाणींनीच कॅलिफोर्नियाला अमेरिकेतील सर्वात श्रीमंत मायनिंग क्षेत्रांमध्ये सामील करण्यास मोठी भूमिका बजावली होती. येथून सुमारे 1 अब्ज डॉलर्सचे खनिज बाहेर काढण्यात आले होते असे सांगण्यात येते. येथील चांदीमुळेच लॉस एंजिलिस चमकल्याचे बोलले जाते. अंडरवूड यांच्यानुसार सेरो गोर्डोमधील चांदी खेचरांद्वारे पर्वतांखाली आणली जायची आणि मग लॉस एंजिलिस येथे पोहोचायची. त्या काळात लॉस एंजिलिस एक छोटेसे धूळयुक्त शहर होते. सेरो गोर्डो येथील खाणींमधील संपत्तीनेच पश्चिम अमेरिकेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु काळासोबत सेरो गोर्डोची कहाणी इतिहासाच्या पानांमध्ये मागे राहिली. माझा प्रयत्न जुन्या शहराला वाचविण्याचा नाही तर याच्या कहाणीला जिवंत ठेवण्याचा आहे. जर हे ठिकाण संपुष्टात आले तर याच्याशी निगडित कहाणीही संपुष्टात येईल असे अंडरवूड यांचे सांगणे आहे.

निर्जन खाणींना लायब्रेरीचे स्वरुप

या शहरात 12 हून अधिक जुन्या इमारीत आणि सुमारे 30 मैल लांब माइन शाफ्ट आहे. अंडरवूड यांनी या जुन्या जागांना नवे रुप देण्याचे सत्र आरंभिले आहे. त्यांनी जुन्या डायनामाइट स्टोअरहाउसला एका लायब्रेरीत बदलले आहे. येथील खाणींमधून काढण्यात आलेल्या जुन्या लाकडांद्वारे शेल्फ तयार करण्यात आले असून तेथे मायनिंगशी निगडित जुनी पुस्तके ठेवण्यात आली आहेत. अंडरवूड जगापासून काही अंतरावर काही वेळ घालविण्यासाठी हे आकर्षक ठिकाण असल्याचे सांगतात. शहरात एक जुने ब्रोथलही आहे, याचे नाव लोलाज प्लेजर हाउस आहे. आता या इमारतीला एका संग्रहालयात बदलण्याची त्यांची योजना आहे. शहरात जुने तपासणी कार्यालयही होते, तेथे मायनर्सनी आणलेल्या खनिजांची पडताळणी व्हायची. मायनर्सनी आणलेल्या खनिजाला वितळवून अधिकारी तपासणी करायचे आणि मग त्यात किती चांदी आहे हे सांगायचे.

जुना सिनेमा हॉल

या शहरात एक जुना सिनेमा हॉल असून तो पुन्हा वेस्टच्या शैलीत तयार करण्यात येणार आहे. या जुन्या काळातील वेस्टर्न थिएटरला बदलून येथे फिल्म नाइट्स आयोजित करण्याची योजना आहे. सेरो गार्डोच्या मधोमध शहराचा मूळ मालक मोरटायमर बेलशॉचे घर होते. तेथेच आता अंडरवूड राहत आहेत. तेथून ते पूर्ण शहरावर नजर ठेवू शकतात.

लवकरच हॉटेल सुरू होणार

या शहराला पुन्हा जिवंत करण्याच्या योजनेचा सर्वात मोठा हिस्सा अमेरिकन हॉटेल आहे. ही इमारत 1871 साली निर्माण करण्यात आली होती. भविष्यात येथे बार, रेस्टॉरंट, आउटडोअर पॅटियो आणि 8 गेस्ट रुम्स निर्माण करण्यात येतील.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​