Uncategorized

दहिबाव बावकरवाडी येथे नातवाचा आजी-आजोबांवर प्राणघातक हल्ला

देवगड / प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील दहिबाव बावकरवाडी येथे किरकोळ कारणावरून नातवाने आपल्या आजी-आजोबांवर कोयत्याने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. मधुकर रामजी बावकर (८४) व आनंदी मधुकर बावकर (७०) अशी जखमींची नावे असून दोघांवरही जामसंडे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना १७ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनेतील मुख्य संशयित अक्षय चंद्रकांत बावकर (३२, रा. दहिबाव बावकरवाडी) याला देवगड न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, घटनेची फिर्याद आनंदी बावकर यांनी देवगड पोलीस स्थानकात दिल्यानंतर संशयित अक्षय बावकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहीता कलम १०९ (१), ११८ (२), १३१, ३५१ (२) (३), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. देवगड पोलिसांनी तात्काळ संशयित अक्षय बावकर याला ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनीही घटनास्थळी भेट दिली. घटनेची माहिती घेत त्यांनी देवगड पोलिसांना आवश्यक मार्गदर्शन करून सखोल तपास करण्याबाबतच्या सूचना केल्या. देवगड पोलिसांनी मंगळवारी संशयित अक्षय बावकर याला येथील न्यायालयासमोर हजर केले. घटनेचा तपास देवगडचे पोलीस निरीक्षक शाम बुवा करीत आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​