372 धावांचे लक्ष्य; श्रीलंकेचे 4 गडी बाद

भारताचा दुसरा डाव 193 धावांवर आटोपला : ऋषभ पंतचे अर्धशतक, पडिक्कलची उपयुक्त खेळी
वृत्तसंस्था
गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली असून भारताने दुसऱ्या डावात 193 धावा करत श्रीलंकेसमोर विजयासाठी 372 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. श्रीलंकेची दिवसअखेर 34 षटकांत 84 धावांवर 4 बाद अशी अवस्था झाली. त्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी अजून 288 धावांची गरज असून भारताला विजयासाठी केवळ 6 विकेट्स घ्यायच्या आहेत.
भारताने पहिल्या डावात 462 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांत आटोपल्याने भारताला पहिल्या डावात तब्बल 178 धावांची आघाडी मिळाली. मानव सुथारने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात प्रभावी गोलंदाजी करत 4 विकेट्स, तर रवींद्र जडेजाने 3 विकेट्स घेत भारताला मोठी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या डावात भारताची सुऊवात खराब झाली. यशस्वी जैस्वाल लवकर बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. राहुलला पायचीत दिल्यानंतर पडिक्कलच्या सल्ल्यामुळे त्याने डीआरएस घेतला आणि त्याचा फायदा भारताला झाला. पण तो फार वेळ टिकू शकला नाही. राहुल अखेर 35 धावांवर बाद झाला, तर पडिक्कलने 44 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यानंतर ऋषभ पंतने आक्रमक फलंदाजी करत 66 धावांची शानदार खेळी केली. त्याने 69 चेंडूंत 8 चौकार आणि 2 षटकार ठोकले. पंतच्या या आक्रमक खेळीमुळे भारताने आपली आघाडी वेगाने वाढवली. भारताचा दुसरा डाव 193 धावांवर आटोपला. श्रीलंकेकडून असिता फर्नांडोने प्रभावी गोलंदाजी करत 4 विकेट्स, प्रभात जयसूर्याने 3 विकेट्स, तर लाहिरू कुमाराने 2 विकेट्स घेतल्या.
लंकेचीही खराब सुरुवात
372 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुऊवात अत्यंत खराब झाली. मोहम्मद सिराजने निशान मदुश्काला बाद केले. त्यानंतर मानव सुथारने पसिंदू सूर्यबंदाराला बाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. प्रसिद्ध कृष्णाने कमिंदू मेंडिसला माघारी धाडले. त्यामुळे श्रीलंकेची अवस्था 47 धावांवर 4 विकेट्स अशी झाली. मात्र धनंजया डी सिल्वा आणि पहिल्या डावातील शतकवीर सोनल दिनुशा यांनी श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा धनंजया 31 धावांवर, तर दिनुशा 25 धावांवर नाबाद होते. दोघांनी पाचव्या विकेटसाठी अभेद्य 37 धावांची भागीदारी करत श्रीलंकेला आणखी नुकसान होऊ दिले नाही.
पाचव्या दिवशी श्रीलंकेसमोर मोठे आव्हान असणार आहे. भारताच्या फिरकीपटूंना गॉलच्या खेळपट्टीवर आणखी मदत मिळाल्यास भारतीय संघाला सामना जिंकण्याची मोठी संधी आहे. मात्र धनंजया डी सिल्वा आणि सोनल दिनुशा यांनी पहिल्या सत्रात टिच्चून फलंदाजी केली, तर सामना काही काळासाठी रंगतदार होऊ शकतो.
संक्षिप्त धावफलक : भारत प.डाव 426, लंका प.डाव 284, भारत दु. डाव 193 : पंत 66, पडिक्कल 44, असिता फर्नांडो 4, प्रभात जयसूर्या 3 बळी, लंका दु.डाव 34 षटकांत 4 बाद 84.
दिनेश चंडिमल दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर
श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज दिनेश चंडिमल भारताविऊद्ध गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. चौथ्या दिवसाच्या खेळात क्षेत्ररक्षण करताना त्याला डोके आणि खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर केलेल्या तपासणीत अंतर्गत दुखापत आढळली नसली, तरी चंडिमलला ‘कन्कशन’ झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले.
भारताच्या डावातील चौथ्या षटकात के.एल. राहुलच्या फटक्मयावर डीप मिडविकेटवर क्षेत्ररक्षण करत असलेला चंडिमल चेंडू अडवण्यासाठी डीप स्क्वेअरलेगपर्यंत धावला आणि पूर्ण ताकदीने झेप घेतली. त्याने दोन धावा वाचवल्या, मात्र जमिनीवर जोरात आदळल्याने त्याच्या मानेला, खांद्याला आणि डोक्मयाला दुखापत झाली. सीमेपलीकडे कोसळल्यानंतर चंडिमलला सहकाऱ्यांसह संघाचे फिजिओ आणि डॉक्टरांनी तातडीने उपचार दिले. तो मान, डोके आणि खांदा वारंवार पकडताना दिसला. त्यानंतर तो सावधपणे स्वत: चालत डेसिंग रूममध्ये परतला.
श्रीलंका क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार, चांदीमलचे सावधगिरी म्हणून स्कॅन करण्यात आले. स्कॅनमध्ये कोणतीही अंतर्गत दुखापत आढळली नाही. मात्र मैदानावर डॉक्टर आणि संघाच्या फिजिओथेरपिस्टने केलेल्या कन्कशन मूल्यांकनानंतर त्याला पुढील खेळासाठी अपात्र ठरवण्यात आले. त्याच्या जागी पसिंदू सोरियाबंदारा याची कन्कशन रिप्लेसमेंट म्हणून निवड करण्यात आली असून, सामन्याच्या रेफरीने या बदलाला मंजुरी दिली आहे. चंडिमलने या कसोटीच्या पहिल्या डावात केवळ 4 धावा केल्या होत्या.
पंतचा षटकारांच्या ‘शतका’चा विक्रम
भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतने कसोटीमध्ये सर्वात जलद षटकारांचे ‘शतक’ नोंदवण्याचा भारतीय विक्रम केला आहे. हा पराक्रम करणारा तो भारताचा पहिला तर जागतिक क्रिकेटमधील एकंदर चौथा फलंदाज बनला आहे. हा माईलस्टोन सर्वात कमी सामन्यांत गाठणारा तो पहिला फलंदाज बनला आहे. त्याने हा टप्पा 51 व्या सामन्यात गाठला तर इंग्लंडच्या बेन स्टोक्सने 82 व्या कसोटीत हा माईलस्टोन गाठला होता.
कसोटीत सर्वाधिक षटकार नोंदवणारे फलंदाज
क्रम फलंदाज षटकार
1 बेन स्टोक्स, इंग्लंड 138
2 ब्रेन्डन मेकॉलम, न्यूझीलंड 107
3 अॅडम गिलख्रिस्ट, ऑस्ट्रेलिया 100
4 रिषभ पंत, भारत 100
5 ख्रिस गेल, विंडीज 98
6 सेहवाग, रोहित शर्मा 91
Source link



