Uncategorized

सावंतवाडी अपघातात युवक युवती ठार

सावंतवाडी प्रतिनिधी : कोलगाव येथील मियासाब दर्ग्याजवळ दुचाकी आणि चारचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वारासह मागे बसलेल्या युवतीचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली स्विफ्ट कारचालकाला सावंतवाडी पोलिसांनी आज सकाळी अटक केली.

या अपघातात कार्तिक अरविंद परब (वय २१, रा. भालावल) आणि आयुषी अरविंद देसाई (रा. गोठोस) यांचा मृत्यू झाला. दोघेही सावंतवाडीत वास्तव्यास असून महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. हा अपघात शनिवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास कोलगाव येथील जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील मियासाब समाधीजवळ झाला. जीए-०३ एबी-७५०१ क्रमांकाच्या दुचाकीची आणि एमएच-०७ एजी-७८०१ क्रमांकाच्या स्विफ्ट कारची समोरासमोर धडक झाली. कार सावंतवाडीच्या दिशेने, तर दुचाकी कुडाळच्या दिशेने जात होती.

धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील कार्तिक परब आणि आयुषी देसाई रस्त्यावर फेकले गेले. आयुषी देसाई हिचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या कार्तिक परब याच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना काही तासांनी त्याची प्राणज्योत मालवली. अपघातानंतर स्विफ्ट कार रस्त्यालगतच्या गटारात घुसली असून तिच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी स्विफ्ट कारचालक गोपाळ सुरेश गावडे (रा. चौकुळ, केगदवाडी) याला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे यांनी दिली.

अपघातानंतर महेश बांदेकर, कृष्णा धुळपणावर आणि लादू रायका यांनी जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज राऊत, पोलीस हवालदार सुरेश पाटील, पोलीस हवालदार धोत्रे, पोलीस कॉन्स्टेबल पवन परब आदींनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​