Uncategorized

दाणोली येथील विजय बांदेकर यांचे निधन

ओटवणे प्रतिनिधी : दाणोली बाजार येथील रहिवासी विजय बापू बांदेकर (८२) यांचे रविवारी २६ जुलै रोजी रात्री उशिरा गोवा बांबुळी रुग्णालयात निधन झाले. गेले दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर त्यांचे निधन झाले. विजय बांदेकर यांनी सुरुवातीला दाणोली पंचक्रोशी परिसरात पोस्टमन म्हणून सेवा बजावली. त्यानंतर अनेक वर्ष ते दाणोली सरकार मान्य धान्य दुकानात ते लिपिक होते. त्यांना वाचनाची प्रचंड आवड असल्याने दाणोलीतील श्री समर्थ साटम महाराज वाचनालयातील इतर हजारो पुस्तके वाचून पूर्ण केली होती. शांत व मनमिळावू स्वभावामुळे ते दाणोली पंचक्रोशीत सर्वांनाच परिचित होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत बांदेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दैनिक तरुण भारत संवादचे पेपर विक्रेते विष्णू उर्फ अमोल बांदेकर, गोवास्थित मेकॅनिक प्रदीप बांदेकर यांचे ते वडील होत. तसेच गुरुनाथ बांदेकर यांचे ते भाऊ तर प्राथमिक शिक्षक प्रसाद बांदेकर आणि दाणोली हायस्कूलचे निवृत्त कर्मचारी राजन बांदेकर यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, भाऊ, भावजय पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​