Uncategorized
केसरीत २२ जुलैला महारक्तदान संकल्प शिबिर

सावंतवाडी प्रतिनिधी : भाजप आंबोली मंडळ व के.एस.आर. ग्लोबल एक्वेरियम यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, दि. २२ जुलै रोजी ‘सेवा यज्ञ महारक्तदान संकल्प’ या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर केसरी येथील के.एस.आर. ग्लोबल एक्वेरियम येथे सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत होणार आहे. “चला, विक्रमी रक्तदान करूया; रक्तदान हीच राष्ट्रभक्ती!” असा संदेश देत सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसभापती गौरव मुळीक व आंबोली मंडळाचे अध्यक्ष संतोष राऊळ यांनी केले आहे.
या ‘सेवा यज्ञ महारक्तदान संकल्प’ शिबिराला जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, अवनी नाईक, सौ. गावडे तसेच पंचायत समिती सदस्या प्राजक्ता केळुसकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Source link



