Uncategorized

दिव्यांग भगिनीला व्हीलचेअर प्रदान; सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम

वेंगुर्ला : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साईकृपा दिव्यांग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्र, ओरस यांच्या वतीने उभादांडा येथील कल्पना एकनाथ बांबार्डेकर या दिव्यांग भगिनीला व्हीलचेअर प्रदान करण्यात आली.
उभादांडा शाळा क्रमांक २ परिसरात राहणाऱ्या कल्पना बांबार्डेकर यांना दैनंदिन हालचाली करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यांची गरज ओळखून संस्थेने त्यांना व्हीलचेअर उपलब्ध करून देत सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला. संस्थेचे प्रतिनिधी अनिल शिंगाडे यांच्या हस्ते व्हीलचेअर सुपूर्द करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, सुनील कांबळी, हर्षद खरात, सेजल तोरसकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त केली. तसेच अशा उपक्रमांमुळे दिव्यांग बांधवांना नवे बळ, आत्मविश्वास आणि समाजातील आपलेपणाची जाणीव मिळते, असे मत व्यक्त केले.
व्हीलचेअर मिळाल्याने कल्पना बांबार्डेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत संस्था व सहकार्य करणाऱ्या सर्व दात्यांचे मनःपूर्वक आभार मानले. दिव्यांगांच्या गरजा ओळखून त्यांना आवश्यक सहाय्य पुरविण्याचे कार्य साईकृपा दिव्यांग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत सातत्याने सुरू असून, भविष्यातही असे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​