Uncategorized
राजू परुळेकर यांना मातृशोक – Tarun Bharat

मालवण | प्रतिनिधी : मठबुद्रुक येथील रहिवाशी कै. शालिनी दामोदर परुळेकर (वय 90) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. परिसरात मास्तरीण या नावाने त्या प्रसिद्ध होत्या. सध्याच्या युगा मध्ये लोप पावत चाललेल्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये परुळेकर कुटुंबाला एकत्र ठेवण्यात कै. शालिनी परुळेकर यांचा मोलाचा वाटा होता.
त्यांच्या पश्चात मुलगा, 5 मुली व सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मालवण पं.स. माजी उपसभापती सतिश (राजु) परुळेकर यांच्या मातोश्री तसेच पं.स. सदस्या सौ. सीमा परुळेकर यांच्या सासूबाई होत.
Source link



