Uncategorized

Australia’s one-tonne seal ‘Neil’ makes headlines.

वजन आणखी तीनपट वाढणार असल्याचा वैज्ञानिकांचा दावा

ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया प्रांतात सध्या एक सागरी जीव सर्वाधिक चर्चेत आहे. याचे नाव ‘नील’ आहे. हा एक साउथर्न एलिफेंट सील असून त्याचे वजन जवळपास 1 हजार किलो आहे. नील समुद्रातून बाहेर पडत शहरातील रस्त्यांपर्यंत पोहोचला आहे. कधी हा कार्सदरम्यान फिरताना दिसून येतो, तर कधी रस्त्याच्या कडेला आराम करताना नजरेस पडतो. याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

नीलला पाहण्यासाठी मोठ्या संख्येत लोक पोहोचत आहेत, अनेक ठिकाणी गर्दी देखील होतेय. वन्यजीव अधिकारी लोकांना वारंवार सीलपासून अंतर राखा आणि त्याला त्रास न देण्याचे आवाहन करत आहेत. नील सध्या आराम करत असल्याने त्याला छेडणे योग्य नसल्याचे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे.

ऑस्ट्रेलियात सागरी जीव किनाऱ्यांवर येणे सामान्य बाब आहे. परंतु इतका मोठा एलिफेंट सील शहराच्या रस्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रकार अत्यंत कमी दिसून येतो. याचमुळे नील सध्या पूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला आहे. साउथर्न एलिफेंट सील जगातील सर्वात मोठी सील प्रजाती आहे, नील अद्याप पूर्णपणे मोठा झालेला नाही. आगामी काळात याचे वजन आणि आकार दोन्ही वाढू शकतो असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.

 

शहरात का आला नील?

एलिफेंट सील अनेकदा समुद्रातून बाहेर पडत किनारा पिंवा त्याच्या आसपास आराम करण्यास येतात. यादरम्यान त्यांच्या शरीरावरील जुनी त्वचा आणि केस झडतात आणि नवा थर निर्माण होतो. याला मोल्टिंग म्हटले जाते. यामुळे हा अनेक दिवसांपर्यंत एकाच ठिकाणी आराम करतो. नील देखील याच कारणामुळे शहराच्या आसपास दिसून येत आहे. तो कुणाला नुकसान पोहोचवत नसून आराम करण्यासाठी जागा शोधत आहे.

लोकांची होतेय गर्दी

सुमारे एक टन वजनी नीलला रस्त्यावर फिरताना पाहून लोक चकित झाले आहेत. त्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येत लोक पोहोचत आहेत. अनेक लोक छायाचित्रे काढण्यासोबत चित्रण करत आहेत. काही व्हिडिओंमध्ये नील कारनजीक आणि ट्रॅफिक बॅरियरच्या आसपासही दिसून येतोय. परंतु त्याच्या अधिक नजीक न जाण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी लोकांना दिला आहे.

जगातील सर्वात मोठा सील

दक्षिण एलिफेंट सील जगातील सर्वात मोठा सील मानला जातो. एक मोठा नर 5-6 मीटर लांब आणि 3-4 हजार किलोपर्यंत वजनाचा असू शकतो. मादी याहून अत्यंत छोटी असते. हे सील दक्षिण महासागर, अंटार्क्टिकानजीक, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड आणि आसपासच्या बेटांवर दिसून येतात. हे 1 हजार मीटरपेक्षा अधिक खोल समुद्रात संचार करू शकतात आणि सुमारे दोन तासांपर्यंत पाण्याच्या आत राहू शकतात.

अधिकाऱ्यांचे काय सांगणे?

नील सध्या शांत आहे, परंतु तो एक विशाल सागरी जीव आहे, त्याच्या नजीक कुणी गेले किंवा त्याला त्रास दिला गेला तर तो स्वत:च्या सुरक्षेसाठी प्रतिक्रिया देऊ शकताहे. याचमुळे लोकांना अंतर र ाखण्याचे आवाहन करण्यात आल्याचे वन्यजीव अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नील सध्या लोकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. सागरी जीवांना दूरवरून पाहिले जावे, यामुळे जीवही सुरक्षित राहतात आणि लोकांनाही कुठलाच धोका निर्माण होत नाही असे तज्ञांचे सांगणे आहे. तर नील आराम केल्यावर सुरक्षितपणे समुद्रात परतावा असा प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​