Uncategorized

न्हावेलीत पर्यटकाच्या कारला गव्याची जोरदार धडक

गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान

न्हावेली :

गोवा येथे पर्यटनासाठी गेलेल्या रत्नागिरीतील पर्यटकांच्या गाडीला न्हावेली येथे गव्याची जोरदार धडक बसली. या अपघातात त्यांच्या गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने चालक तसेच गाडीतील अन्य कुटुंबीयांना कोणतीही इजा झाली नाही. याबाबत तेथूनच शिरोड्याच्या दिशेने जाणारे कारचालक सुधाकर रेडकर यांनी वनविभागाला माहिती दिली असून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​