Uncategorized

फ्रँकफर्ट विमानतळावर विमान दुर्घटना

फ्रँकफर्ट :

जर्मनीतील प्रँकपर्ट विमानतळावर उभे एक प्रवासी विमान अचानक पुढील बाजुला झुकले. विमानाचे पुढील चाक तुटल्याने त्याचा समोरील हिस्सा जमिनीवर कोसळला. या दुर्घटनेत अनेक कर्मचारी जखमी झाले आहेत. जर्मन एअरलाइन्स लुफ्थांन्साचे बोइंग 787-9 ड्रीमलाइनर विमान उ•ाणाच्या तयारीत असताना ही घटना घडली आहे. त्यावेळी प्रवासी विमानात दाखल झाले नव्हते, परंतु क्रू मेंबर आणि ग्राउंड स्टाफ आत होता. सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओत विमानाचा पुढील हिस्सा वेगाने खाली कोसळताना दिसून येतो. घटनेनंतर विमानतळावर आपत्कालीन पथकांनी तातडीने धाव घेतली. जखमींवर उपचार सुरू आहेत, हे विमान फ्रँकफर्ट येथून लॉस एंजिलिसच्या दिशेने जाणार होते अशी माहिती लुफ्थांसा एअरलाइन्सने दिली आहे.तर ज्या विमानासोबत हा प्रकार घडला, ते नवे बोइंग 787-9 ड्रीमलाइनर होते आणि जानेवारी महिन्यातच नियमित सेवेत सामील झाले होते. सध्या या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​