Uncategorized
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बी. के. हरिप्रसाद

मंत्री सतीश जारकीहोळी यांना संधी हुकली
बेंगळूर : राज्यात डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर लागलीच हायकमांडने कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांची नेमणूक केली आहे. हे पद मंत्री सतीश जारकीहोळी यांना मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, अखेरच्या क्षणी हरिप्रसाद यांचे नाव पुढे आले आहे. शिवाय हरिप्रसाद यांची पुन्हा एकदा कर्नाटक विधानपरिषदेवर वर्णी लावली जाणार आहे. शिवकुमारांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची अपेक्षा बाळगून असलेल्या बी. के. हरिप्रसाद यांच्यावर कर्नाटक काँग्रेसची धुरा सोपविण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.
Source link



