Uncategorized
तुळस येथील जैतिर उत्सव 16 मे रोजी

वेंगुर्ले वार्ताहर –
तुळस येथील प्रसिद्ध श्रीदेव जैतिराचा वार्षिक उत्सव शनिवार दि. 16 मे पासून सुरु होणार आहे. यानिमित्त मंदिर परिसरात खेळणी, मिठाई, शेतीपयोगी, गृहपयोगी वस्तूंची दुकाने मांडली जाणार आहेत. या उत्सवासाठी सिंधुदुर्गाबरोबरच मुंबई, पुणे, गोवा यासह अन्य ठिकाणचेही भाविक मंडळी उपस्थित रहात असतात. तुळस गावासाठी हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते. जैतिर देव संपूर्ण तुळस गावातील प्रत्येक घरोघरी जात असल्याने आपल्या देवाचे स्वागत करण्यासाठी आणि त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी तुळसवासीयांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. काही दिवसांतच मंदिराच्या ठिकाणी जत्रेचे स्वरुप येणार आहे. यासाठी देवस्थानतर्फे नियोजन केले जात आहे. दरम्यान, सोमवार दि. 25 मे रोजी कवळासाने या उत्सवाची सांगता होणार आहे.
Source link



