Uncategorized

Shivaji Patil On Hasan musrif | मुश्रीफ साहेब…चूक नाही, मग घाबरता का? MLA शिवाजी पाटलांचा खडा सवाल

               गोकुळ निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले

कोल्हापूर : गोकुळच्या निवडणूका काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे. याआधीच महायुती अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळते.गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप आमदार शिवाजी पाटील यांच्यातील वाद उफाळून आला आहे.

गेली 40 वर्षे मला सामाजिक आणि राजकीय अनुभव आहे. सहावेळा निवडून आलो असून तब्बल 25 वर्षे मंत्रीपद भूषवले आहे. त्यामुळे कोण काय बोलते याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री मुश्रीफ यांनी दिली होती. आता आमदार शिवाजी पाटील यांनी पलटवार केला आहे..

आमदार शिवाजी पाटील म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी शासनाच्या काळात 3700 डेअरीपैकी 1210 डेअरी जन्माला घातल्या. अशा काही बेकायदेशीर दूध डेअरींवर कायदेशीर कारवाई व्हावी असा माझा आरोप होता. आता भारत शासनाने सक्षम प्रशासक नेमले आहेत, त्यामुळे हा प्रश्र मार्गी लागेल असा मला विश्वास आहे.

पुढे ते म्हणालेस, मंत्री मुश्रीफ आरोपांना विरोध करत आहेत. ते मंत्री मंडळातील कॅबीनेट मंत्री असून चौकशीला का घाबरत आहेत? असा सवालही आमदार पाटील यांनी केला. तुम्ही जर चुकीचे नसाल तर घाबरायचे काय? प्रशासनाच्या चौकशीला सामोरे जायला हरकत काय असे खडे बोलही त्यांनी सुनावले आहेत.

त्यामुळे मुश्रीफांनी पदाचा राजीनामा द्यावा, राजीनामा देवून त्यांनी सक्षमपणे जनतेला सामोरे जावे. इतरांसारखे माझे कुठेही साखर कारखाने, संस्था, बॅंका, पतसंस्था, महाविद्यालये नाहीत. जिल्हा बॅंकेच्या अतंर्गत अशा अनेकांवर दोनशे-तीनशे कोटींची कर्जे आहेत. त्यामुळे ती मंडळी मंत्री मुश्रीफांच्या दबावाखाली आहे. ते केडीसीसी आणि गोकुळचे दिग्गज नेते आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​