सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णसेवा पूर्ववत

सर्व्हर डाऊनची समस्या झाली दूर
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
सर्व्हर डाऊनमुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील ठप्प झालेल्या सेवा पुन्हा सुरू झाल्या आहेत. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी ओपीडी परिसरात गृहरक्षक दलाच्या जवानांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सर्व्हर डाऊनमुळे मन:स्ताप सहन करावा लागत होता. रुग्णांची नावे नोंदणी, बिल भरतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शुक्रवारी ही व्यवस्था मार्गी लागल्याचे चित्र पहायला मिळाले.
उपचाराआधी केसपेपर बनवण्यासाठीच रुग्णांना मोठी धडपड करावी लागत होती. त्यामुळे बिम्स प्रशासनाच्या नावे शिव्याशाप देत रुग्ण व त्यांचे नातेवाईक गर्दीत ताटकळत उभे रहात होते. सर्व्हरची समस्या दूर झाल्यामुळे शुक्रवारी ही व्यवस्था सुरळीत झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
Source link



