Uncategorized

सावंतवाडीत आत्मेश्वर मंदिराजवळ झाड कोसळून मंदिरासह वाहनाचे नुकसान

सावंतवाडी : सावंतवाडीत येथील प्रसिद्ध आत्मेश्वर मंदिराजवळ असलेले एक जुने, भलेमोठे आंब्याचे झाड अचानक कोसळल्याची घटना घडली. हे झाड थेट आत्मेश्वर मंदिराच्या छपरावर पडल्याने छपराच्या काही भागाचे मोठे नुकसान झाले. झाड कोसळले, त्याच वेळी मंदिराच्या आवारात एक पिकअप व्हॅन उभी होती. हे झाड त्या वाहनावरही कोसळले.

या दुर्घटनेत स्थानिक नागरिक हळदणकर यांच्या मालकीच्या पिकअप व्हॅनचे मोठे नुकसान झाले असून, व्हॅनच्या पाठीमागील हौद्याचा चक्काचूर झाला आहे. झाड अतिशय जुने असल्यामुळे ते मुळापासून कमकुवत होऊन पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​