सावंतवाडीतील जलाल शहा पिर उत्सवाची नववी रात्र उद्या

सावंतवाडी शहर वार्ताहर
सालाबाद प्रमाणे सावंतवाडी शहरातील बाहेरचावाडा येथील प्रसिद्ध असलेल्या जलाल शहा पीर यांच्या उत्सवाला सुरूवात झालेली आहे. या पिरांची उत्सवाची नववी रात्र बुधवार 24 जून रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी होणार आहे. या दिवशी संध्याकाळी ६ ते गुरुवार 25 जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत चालतात. त्या दिवशी भाविकांचे नवस बोलणे, नवस फेडले जातात. हा पीर ४५० वर्षांपूर्वीपासून आहे. हा जलाल शहा पीर सावंतवाडी संस्थानच्या काळात या ठिकाणी जलाल फकीर बसत होता, त्यामुळे या पिराचे नाव जलाल शहा पीर अशी ओळख निर्माण झाली आहे. शुक्रवार 26 जून रोजी मोहरम कौसात ताजियाचे विसर्जन होणार आहे.
सावंतवाडी शहर व परिसरात एकूण सात ठिकाणी मोहरम उत्सव होतो. जलाल शहा पीर, काझी पीर, सय्यद कादरी पीर, निंबाळकर पीर, पटवे पीर, दरवेश पीर, म्हाताचे पीर, अशा ठिकाणी मोहरम उत्सव साजरा केला जातो. त्यामध्ये जलाल शहा पीर हा प्रमुख पीर आहे. सावंतवाडीसह कर्नाटक, गोवा व इतर भागातून हिंदू, मुस्लिम, भावीक मोठे संख्येने उपस्थित राहुन नवस फेडतात. या पिराकडे सावंतवाडीत संस्थान पासून जी परंपरा चाललेली आहे त्या परंपरेनुसार आजपर्यंत चालू आहे. या पिराची धार्मिक विधी मुजावर मानकरी भक्तगण मोठ्या संख्येने पार पाडतात. तरी या उत्सवाची नववी रात्र व मोहरम उत्सवाची सांगता कार्यक्रमास सर्व धर्मीय भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुजावर अनवर् शहा,नाशीर शहा व जावेद शहा यांनी केले आहे.
Source link



