विट्यात खळबळ! २३ वर्षीय तृतीयपंथी तरुणाची मंदिरात गळफास लावून आत्महत्या

विटा येथे तृतीयपंथी तरुणाची आत्महत्या
विटा : खानापूर तालुक्यातील विटाशहरातील परिसरात गांधीनगर राहण्प्रया एका २३ वर्षीय तृतीयपंथी तरुणाने राहत्या घराशेजारील मंदिरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रविण अमृत थोरात असे मयत व्यक्तीचे नाव आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस आणि घटनास्थळावरूनमिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण थोरात हा तृतीयपंथी तरुण काल मंगळवारी १४ एप्रिल रोजी रात्री उशिरा घराशेजारीच असलेल्या यल्लमा देवी च्या खोलीवजा मंदिरात गेला. तिथे ओढणीने गळफास लावून घेतला. विशेष म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. या घटनेची माहिती मिळताच त्याचा भाऊ तुषार थोरात यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्या पूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
Source link

