Uncategorized
अंकुर भट्टाचार्यजीला दुहेरी सुवर्णपदक

वृत्तसंस्था, नवी दिल्ली
झेक येथे झालेल्या डब्ल्यूटीटी फिडर ओलोमीक टेबलटेनिस स्पर्धेत भारताचा टेबलटेनिसपटू अंकुर भट्टाचार्यजीने पुरुष एकेरीत आणि दुहेरीत अशी दोन सुवर्णपदकांची कमाई केली.
पुरुष एकेरीतील झालेल्या अंतिम सामन्यात टेबलटेनिसपटूंच्या मानांकनात 78 व्या स्थानावर असलेल्या अंकुर भट्टाचार्यजीने स्लोव्हेनियाच्या तृतीय मानांकीत डेनी कोझुलचा 3-1 (9-11, 11-4, 11-5, 11-6) अशा गेम्समध्ये पराभव करत विजेतेपदासह सुवर्णपदक घेतले. त्यानंतर झालेल्या पुरुष दुहेरीच्या सामन्यात अंकुरने आकाश पालसमवेत हंगेरीचा साबा झेनोशी आणि पोलंडचा झेलेव्हेस्की यांचा 3-1 (11-8, 4-11, 13-11, 11-9) अशा गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदक मिळविले.
Source link



