Uncategorized

दैनिक तरुण भारत-धेंपो महाविद्यालयातर्फे आयोजित ‘घुमट गाज’ स्पर्धेचा शुभारंभ

पणजी : दैनिक तरुण भारत आणि श्रीनिवास सिन्नाई धेंपो महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘घुमट गाज’ या स्पर्धेचा आज सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. उच्च महाविद्यालयीन गटातील स्पर्धांना यावेळी सुरुवात करण्यात आली.

या स्पर्धेचे उद्घाटन गोवा पर्यटन विकास महामंडळाचे उपसरव्यवस्थापक दीपक नार्वेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीनिवास सिन्नाई धेंपो महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत, दैनिक तरुण भारतचे संपादक सागर जावडेकर आणि सरव्यवस्थापक सचिन पवार उपस्थित होते.

‘घुमट गाज’ या स्पर्धेच्या माध्यमातून गोव्याच्या सांस्कृतिक आणि पारंपरिक कलांना व्यासपीठ मिळत असून, युवा पिढीला आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्पर्धेच्या शुभारंभामुळे सहभागी विद्यार्थी आणि कलाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

उच्च महाविद्यालयीन गटातील स्पर्धांना आजपासून सुरुवात झाली असून, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच पारंपरिक कला आणि संस्कृतीचे जतन करण्याच्या दृष्टीने ‘घुमट गाज’ स्पर्धेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​