Uncategorized

पुण्यात गणेशोत्सवात ‘डीजे’चे काय? मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली स्पष्ट भूमिका

पुणे : पुण्यातील गणेशोत्सवात डीजे आणि ढोल-ताशांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील गणेशोत्सवाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. सण-उत्सव शक्य तितक्या पारंपरिक पद्धतीने आणि कमीत कमी ध्वनिप्रदूषण करून साजरे केले जावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

बजाज फिनसर्व्हच्या मुख्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी गणेशोत्सवातील डीजेच्या वापराबाबत भाष्य केले. डीजेसारख्या काही पद्धती वर्षानुवर्षे सुरू आहेत. त्या केवळ कायद्याचा बडगा उगारून बंद करता येणार नाहीत. त्यासाठी लोकांना विश्वासात घेऊन आणि चर्चा करून मार्ग काढावा लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

डीजेचे स्तोम कमी करण्याची भूमिका

“डीजेमुळे नागरिकांना मोठा त्रास होतो. त्यातून भूकंप झाल्यासारखा आवाज निर्माण होतो. अशा गोष्टी घडू नयेत, यावर सर्वांचेच एकमत आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले.

पुण्याचा गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. आगामी काळात डीजेचे स्तोम कमी झालेले किंवा पूर्णपणे संपलेले दिसेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने आणि कमीत कमी ध्वनिप्रदूषणासह साजरा करण्यावर भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गणेश मंडळांशी पोलिसांची चर्चा

पुण्याचे पोलीस आयुक्त गणेशोत्सवाशी संबंधित विविध घटकांशी चर्चा करत आहेत. या चर्चेत अनेक मुद्द्यांवर एकमत झाले असून, त्यातून योग्य तोडगा निघेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाला विरोध करणारे विद्यानंद बापट यांच्या भूमिकेला भाजपसह काही गणेशोत्सव मंडळांकडून विरोध होत आहे. त्यामुळे डीजेच्या मुद्द्यावरून पुण्यातील वातावरण तापले आहे.

बापट यांच्या समर्थनार्थ रविवारी मोर्चा

विद्यानंद बापट यांच्यावर टिळक रोड परिसरात हल्ला झाल्याची घटना समोर आल्यानंतर या प्रकरणावरूनही राज्यभरात प्रतिक्रिया उमटल्या. बापट यांच्या समर्थनार्थ आणि ‘डीजेमुक्त’ गणेशोत्सवाच्या मागणीसाठी रविवारी पुणे महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत बापट यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मी जिवंत असेन तर मोर्चात सहभागी होणार,” असे त्यांनी सांगितले.

आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकेनंतर पुण्यातील गणेशोत्सवात डीजेच्या वापराबाबत प्रशासन नेमका कोणता निर्णय घेते, याकडे गणेश मंडळांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​