पन्हाळा नगरपरिषदेच्या वृक्षारोपणावर प्रश्नचिन्ह

पन्हाळा : पन्हाळा नगरपरिषदेच्याबतीने माझी वसुंधरा अंतर्गत २०२४ साली १००० झाडे लावल्याचे कागदावर दिसून येते. पण प्रत्यक्ष पडताळणीत फक्त ३४ झाडे समोर आल्याने इतर झाडे चोरीला गेली काय? असा संतप्त सबाल पन्हाळ्यातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासकीय काळात या वृक्षारोपण अभियानात घोळ झाला असून याची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
पन्हाळ्यातील नागरिकांनी नगरपरिषदेत धडक देत माझी वसुंधरा अभियानांतर्गत लावण्यात आलेल्या झाडांच्या बाबत विचारणा करण्यात केली. यावेळी १००० झाडे लावण्याचा ठेका नगरपरिषदेकडून देण्यात आला. झाडे लावून झाल्याने नगरपरिषदेकडून २५ लाख ३९ हजार रुपये बिल काढण्यात आले. नही झाडे अंधारबाव ते लता मंगेशकर बंगला या परिसरात लावण्यात येणार होती. मात्र काही तांत्रिक कारणामुळेही झाडे सज्जाकोठी, तानपीरपट्टी व गायकवाड बाडा या परिसरात लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी नागरिकांनी संबंधित अधिकायांना घेऊनच सज्जाकोठी या ठिकाणी लावलेल्या झाडांची पडताळणी केली असता या ठिकाणीफक्त ३४ झाडे दिसून आली. तर उर्वरित झाडे कुठे लावण्यात आली आहेत हे अधिकाऱ्यांनाच माहीत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
दरम्यान, संबंधित अधिकारी येण्याअगोदर हे वृक्षारोपण करून बरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बिल काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रशासकीय काळात माझी वसुंधरा अंतर्गत लावण्यात आलेल्या झाडांमध्ये मोठा घोळ झाला असून याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Source link



